बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येला सरकार जबाबदार- प्रविण दरेकर

अहमदनगर | कोरोनाच्या वाढत्या रुग्णांना सरकार जबाबदार असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. त्यांनी अहमदनगर आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

राज्यातील आरोग्य यंत्रणा व्यवस्थित सेवा देत नाही. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. विरोधी पक्षातील कोणी काही बोललं तर राजकारण करतात असं सरकारकडून बोललं जात आहे. मात्र आपलं अपयश दाखवण्यासाठी सरकार हा प्लॅन करत असल्याचा आरोप दरेकर यांनी केला.

केरळ सरकारने कोरोनावर उपाययोजना करताना स्वतः 20 हजार कोटी रुपये खर्च केले. राज्य सरकार मात्र केंद्राने मदत दिली नाही अशी ओरड करत असल्याचं दरेकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, राज्यातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांबाबत राज्यपाल सर्व विद्यापीठांचे कुलपती असतात, तेच निर्णय घेतील. मात्र 40 ते 50 टक्के विद्यार्थ्यांना एटीकेटी आहे. त्यामुळे सरासरी पद्धतीने निकालाचा विचार केला, तर एटीकेटीच्या विद्यार्थ्यांचा नुकसान होईल. त्यामुळे सगळा विचार करुन निर्णय घ्यावा, असं मत दरेकरांनी व्यक्त केलं आहे.

 ट्रेडिंग बातम्या-

सोनू सूदला पुढे करुन ‘ठाकरे’ सरकारला अपयशी ठरवण्याचा प्रयत्न; राऊतांचा गंभीर आरोप

4 गुंठ्यात शेतकऱ्याने लावला होता गांजा, महिला अधिकाऱ्याच्या कर्तबगारीने बिंग फुटलं…!

महत्वाच्या बातम्या-

भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्यावर दारुड्यांचा हल्ला

अखेर ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी युवराज सिंगने मागितली माफी…!

सोनू सूद भाजप स्पॉन्सर?; वाचा संजय राऊतांच्या रोखठोकमधील सर्व महत्त्वाचे मुद्दे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More