बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘कर नाही, तर डर कशाला’; प्रविण दरेकरांचा राऊतांना टोला

मुंबई | सीबीआयने 21 एप्रिल रोजी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर छापा टाकून सलग 11 तास चौकशी केली होती. पुन्हा एकदा त्यांच्या तपास प्रक्रियेचा भाग म्हणून आज सकाळी त्यांचा नागपुर येथील घरावर छापा टाकला असावा. यापूर्वीही काँग्रेसच्या कार्यकाळात अशा प्रकारच्या अनेक कारवाया झाल्या होत्या. तेव्हा मात्र कोणताही संबंध सरकारशी जोडला गेला नाही. मग आता या कारवाईचा केंद्रातील भाजप सरकारशी संबंध लावणे योग्य आहे का?, असा सवाल विधान परिषद पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केलाय.

मराठा आरक्षण संघर्ष समिती व मराठा आरक्षण समन्वय समिती यांच्यावतीने मराठा आरक्षणाच्या विषयावर राज्यव्यापी मराठा आरक्षण गोलमेज परिषदेचे नवी मुंबई माथाडी भवन येथे आयोजन करण्यात आलं होतं. माजी मुख्यमंत्री नारायण राणे, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आ. प्रसाद लाड, माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील, आयोजक सुरेश पाटीलसह राज्यभरातील अनेक मराठा समाज आरक्षणासाठी लढणाऱ्या संघटनांचे पदाधिकारी या परिषदेस उपस्थित होते. यावेळी दरेकर बोलत होते.

तपास यंत्रणा स्वायत्त असून त्यांच्या पद्धतीने ते काम करतात. त्यामुळे यामध्ये विनाकारण राजकारण करत मूळ विषय वळवण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्षातील काही नेते करत आहेत, असा आरोप प्रविण दरेकर यांनी केला आहे. तसेच कर नाही, तर डर कशाला, असा टोला दरेकरांनी राऊतांना लगावलाय.

कोणत्याही गोष्टीमध्ये तथ्य असल्याशिवाय कारवाई होत नाही व छापेही टाकले जात नाहीत. या प्रकरणात अनिल देशमुख यांनी सामोरं जावं, तपास यंत्रणेकडून काही चुकीचं झालं तर न्यायव्यवस्था आहे, असं दरेकर यांनी सांगितलं. राम मंदिराच्या जमिन व्यवहाराची ईडी चौकशी करावी, घोटाळ्याची चौकशी करा, अशाप्रकारची विधाने करुन वड्यांचं तेल वांग्यावर काढण्याचा प्रयत्न संजय राऊत करताना दिसत आहेत, असं दरेकरांनी म्हटलंय.

थोडक्यात बातम्या- 

जे आहे मराठा समाजाचे खणखणीत नाणे, त्याचं नाव नारायण राणे- रामदास आठवले

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची आजची आकडेवारी, वाचा एका क्लिकवर

‘…मग संजय राऊतांच्या छातीत धडकी का भरली’; चित्रा वाघ यांची राऊतांवर टीका

‘मी फार वर्ष असले उद्योग केलेत’; बिगर भाजप आघाडीबाबत शरद पवारांची मिश्किल टिप्पणी

‘परमबीर आयुक्त पदावर होते त्यावेळी…’; ईडीच्या छाप्यानंतर अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More