बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्य सरकारमुळे कोकणात पूरस्थिती- प्रवीण दरेकर

मुंबई | रत्नागिरी, रायगडमध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. चिपळूणसारख्या ठिकाणी तर घरांत पाणी शिरलं आहे. कोकणातील या परिस्थितीला विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारला जबाबदार धरलं आहे. सरकारचा बेफिकीरपणा आणि ढिसाळ नियोजनामुळे कोकणात पूरस्थिती  निर्माण झाली, असा गंभीर आरोप प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारवर केला आहे.

कोकणाला चहूबाजूंनी पुराच्या पाण्याने वेढल्याने चिपळूणची अवस्था भीषण झाली आहे. यानंतर पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी  प्रविण दरेकर आणि माजी मंत्री, आमदार गिरीश महाजन तातडीने माणगावमध्ये दाखल झाले आहेत.

कोकणाला अतिवृष्टीचा धोका असल्यामुळे कोकणाच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने राज्य सरकारने तातडीने उपाययोजना करण्याची विनंती आपण राज्य सरकारकडे केली होती. परंतु सरकारने याविषयी तातडीने कुठलेही गंभीर पाऊल उचललं नाही, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

बचाव दल आमच्यासोबत असून त्यांनी आम्हाला पुढे जाण्यास अटकाव केला आहे. सकाळपर्यंत पाणी ओसरल्यानंतर एनडीआरएफची टीम बोटीने पुढील प्रवास करेल. आम्ही सुद्धा एनडीआरएफ टीमसोबत जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. येथे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. संपूर्ण महाड आणि रायगडचा परिसर जलमय झाला आहे. यामुळे येथील नागरिकांना प्रचंड हालअपेष्टांना सामोरं जावं लागत आहे, असं दरेकर म्हणालेत.

थोडक्यात बातम्या- 

भारताला मिळू शकते आणखी एक लस; ‘या’ लसीला मंजुरी मिळण्याची शक्यता

‘एमपीएससी’चा मोठा निर्णय!; ‘या’ उमेदवारांना प्रमाणपत्र सादर करावं लागणार

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना आजही पाऊस झोडपणार; हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

“मदत का पोहोचली नाही?, सरकार काय करतंय? असे प्रश्न विचारायचे असतील तर…”

सातारा जिल्ह्यातील ‘या’ गावात भूस्खलन; गावातील नागरिकांना हलवण्याचे आदेश

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More