बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

वेळ पडल्यास बुलडोझरखाली आडवे पडू, पण…- प्रविण दरेकर

मुंबई | नायगाव पोलिस वसाहतीमधील पोलीस कुटुंबियांना घरे खाली करण्याची नोटीस सरकारकडून बजावण्यात आली आहे. या घटनेची माहिती मिळताच भाजप नेते प्रविण दरेकर यांनी तातडीने पोलिस वसाहतीला भेट दिली. दरेकरांनी पोलीस कुटुंबियांचं म्हणणं ऐकून घेतलं.

कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अविरत मेहनत करून जनतेचं संरक्षण करणारा माझा पोलिस रस्त्यावर राहणार का? आम्ही असं होऊ देणार नाही. वेळ पडल्यास बुलडोझरखाली आडवे पडू, पण पोलिसांच्या कुटुंबीयांना बेघर होऊ देणार नाही, असा इशारा प्रविण दरेकरांनी ठाकरे सरकारला दिला आहे.

मोठे पगार घेणारे आयपीएस आपल्या राहण्याची सोय शकतात. परंतु अल्प वेतन असणारे पोलिस बांधव मात्र आपल्या वेतनामधून साधे झोपडेसुद्धा घेऊ शकत नाही. सरकारने याचा विचार नोटिस बजावण्यापूर्वी करायला हवा होता, अशी टीका दरेकरांनी केली आहे.

राज्या सरकार पोलिस वसाहतीच्या दुरूस्तीसाठी लागणाऱ्या आवश्यक निधीपासून पळ काढत असेल तर गरज येथील रहिवाशांसाठी विधानसभेतील आमदार मिळून निधी दुरुस्तीसाठी देऊ. परंतु पोलिस बांधवांना कोणत्याही परिस्थितीत बाहेर काढू देणार नाही, असं प्रविण दरेकर म्हणालेत.

थोडक्यात बातम्या-

“खावाले काळ, नी भूईले भार म्हणजे ठाकरे सरकार”

पुण्याला झिका व्हायरसचा धोका?; केंद्रीय पथक तातडीने पुण्यात दाखल

पुणे-सातारा महामार्गावर शिरवळजवळ विचित्र अपघात, ट्रकची 6 वाहनांना धडक!

भाजपच्या ‘या’ माजी आमदाराला मोठा धक्का! पत्नीच्या शैक्षणिक संस्थेला कोट्यवधींचा दंड

दिलासादायक! महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More