बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…पण सरकारने जनतेला आपलं मानलं नाही, 2 वर्षात राज्य 20 वर्षे मागे गेलं”

मुंबई | महाविकास आघाडी सरकारने सत्तेत येऊन आपले 2 वर्षे पुर्ण केले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर भाजप व महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून एकमेकांवर जोरदार टीकेची झोड उठली आहे. त्यातच आता विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेेते प्रविण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

प्रविण दरेकर यांनी बोलत असताना 5 वर्षे देवेंद्र फडणवीस सत्तेत असताना विकासाचा कार्यकाळ आपण पाहिला, असं म्हटलं आहे. तसेच भ्रष्टाचाराचा एक डागही फडणवीस सरकारने लावून घेतला नाही, पण 2 वर्षात महाराष्ट्र 20 वर्षे मागे गेलाय, मंत्रिमंडळातील अर्ध्या मंत्र्यांवर डाग आहेत, अशा शब्दात घणाघाती हल्ला प्रविण दरेकर यांनी केला आहे.

मुख्यमंत्र्यावर निशाणा साधताना ते म्हणाले की, ‘उद्धव ठाकरे सकाळी म्हणाले की, जनतेनं आम्हाला आपलं मानलं, पण सरकारने जनतेला आपलं मानलं नाही’, असा टोला लगावत  महाराष्ट्रात सरकार नावाची चिज अस्तित्वातच नाही, असा हल्लाबोल दरेकरांनी केला आहे.

प्रविण दरेकर यांनी यावेळी बोलत असताना छगन भूजबळांवरही निशाणा साधला आहे. भूजबळ पालकमंत्री झाल्यानंंतर शहरातील गुन्हेगारी वाढली आहे. असा आरोप करत अमोल इघे यांच्या हत्येची केस फास्ट्रॅक कोर्टात चालवावी आणि संबंधित प्रकरणात तथ्य असल्यास पालकमंत्री छगन भूजबळ यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही दरेकरांनी केली आहे.

थोडक्यात बातम्या

परळीनंतर आता ‘या’ देवस्थानालाही बॉम्बने उडविण्याची धमकी

भारतीय हवामान विभागाकडून जोरदार पावसाचा इशारा, चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातही…

“उद्धव ठाकरे हे अपघाताने झालेले मुख्यमंत्री, केंद्राची कामंही त्यांनी आपल्या खात्यात मांडली”

संजय राऊत आणि सुप्रिया सुळेंचा भन्नाट डान्स व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

“पार्टी आणि पबमध्ये भाजप नेते नेमके कुठे असतात हे उद्यापासून काढायला लावू नका”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More