मुंबई | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण सध्या महाराष्ट्रभर चर्चेत आहे. याप्रकरणात भाजपने शिवसेनेचे नेते वनमंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप केले आहेत. तब्बल 15 दिवसांनी वनमंत्री संजय राठोडांनी समोर येऊन या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं आहे. माझी, माझ्या कुटुंबाची तसेच माझ्या समाजाची कृपा करुन बदनामी करु नये अशी विनंती राठोडांनी यावेळी केली. यावर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी संजय राठोडांसोबत ठाकरे सरकारवरही निशाणा साधला आहे.
राज्यातील महिला, मुलींच्या मनात याविषयी काय यातना होत असतील, याची जाणीव सरकारला व्हावी. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मौन सोडत राज्यातील जनतेच्या प्रश्नांची उत्तर द्यायला हवीत. राज्याचे मुख्यमंत्री सामाजिक दबावाला बळी पडत आहे का? , असा खोचक सवाल प्रवीण दरेकरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केला आहे.
राठोडांनी यावेळी फक्त मीडिया समोर येण्याचा दिखावा केला. समाजाला पुढे करत मीडियावर दबाव निर्माण करत मीडियाला दोष देण्याचा प्रयत्न केला. खरतर त्यांनी प्रायश्चित्त घेऊन मंत्रिपदाचा राजीनामा देणं अपेक्षित होतं पण सत्तेची ताकदचं आपल्याला बाहेर काढू शकते हे त्यांना माहिती आहे. त्यामुळेच त्यांनी राजीनामा दिला नाही. राठोडांनी पूजा चव्हाण हिचा मृत्यू कसा झाला? यावरही काही भाष्य केलं नाही त्यांनी सत्य लपवून ठेवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला, असं म्हणत दरेकरांनी राठोडांवर टीकास्त्र सोडलं आहे.
दरम्यान, गेले 14 दिवस संजय राठोड नॉट रिचेबल होते. मी या 14 दिवसांत माझ्या परिवारासोबत होतो. माझ्या पत्नीला ब्लड प्रेशरचा त्रास आहे, त्यामुळे मी यादरम्यान माझ्या परिवाराची काळजी घेण्यात सोबतचं काही सरकारी कामांमध्ये व्यस्त होतो असं स्पष्टीकरण राठोडांनी दिलं आहे.
थोडक्यात बातम्या-
सनी लिओनीमुळे नेटकरी घायाळ, ‘हे’ फोटो पहायला वन मिलियन लोकांच्या उड्या…
मोदी सरकार शेतकऱ्यांसाठी धोका, असं म्हणत शेतकरी बाप-लेकानं संपवलं आयुष्य
सेक्स कॉल… अभिनेते, नेते, खेळाडूंना मोठा धोका; पोलिसांची धडक कारवाई
पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी होणार?, ‘या’ माणसाचा सल्ला मोदी ऐकणार का?
पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड काय म्हणाले?, वाचा जसंच्या तसं…