बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

प्रविण दरेकरांनी राज ठाकरेंना दिला महत्वाचा सल्ला, म्हणाले…

मुंबई | राज ठाकरे यांनी पक्ष म्हणून व्यापक आणि सर्वसमावेशक भूमिका घेतली पाहिजे, असा सल्ला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी दिला आहे. ते मुंबईत टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.

राज ठाकरे आणि चंद्रकांत पाटील हे दोन्ही वरिष्ठ नेते नाशिकमध्ये आहेत. ते एकमेकांना भेटू शकतात, असं सांगतानाच राज ठाकरे यांनी पक्ष म्हणून व्यापक आणि सर्वसमावेशक भूमिका घ्यावी. आमच्या वरिष्ठ नेत्यांनीही हे मत अनेकदा व्यक्त केलं आहे. पण या संदर्भातील नेमकी माहिती चंद्रकांत पाटीलच देऊ शकतील, असं दरेकर म्हणाले.

आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर आले असातनाच चंद्रकांत पाटील हे सुद्धा नाशिक दौऱ्यावर पोहोचले आहेत. यावरून अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. अशात भाजप आणि मनसेच्या संभाव्य युतीवर चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांसोबत संवाद साधताना एक मोठं वक्तव्य केलं आहे.

मनसे परप्रांतियांच्या बद्दलची भूमिका बदलत नाही तो पर्यंत हे शक्य नाही. राज ठाकरे हे महाराष्ट्राला हवं असलेले नेतृत्व आहे. मात्र, एकट्या मनसेच्या जिवावर सत्ता येणार नाही. आमचा खूप जुना परिचय आहे. योग आला, तर त्यांना भेटेल. ठाकरे आमच्यापासून दूर गेलेले नाहीत, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय.

थोडक्यात बातम्या- 

आपल्या हक्कासाठी राजकीय पक्षांबरोबर बंड करण्याची तयारी करा- विजय वडेट्टीवार

मोठी बातमी! शरद पवारांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट

ईडी, सीबीआयच्या रडारवर कोण कोण? चंद्रकात पाटलांनी केला ‘या’ मोठ्या नावांचा खुलासा

‘या’ तारखेपासून विद्यापीठ, कॉलेज सुरु करा; यूजीसीकडून गाईडलाईन्स जारी

“6 महिन्यांत पेट्रोलच्या किंमती 66 वेळा वाढल्या, केंद्राचं महागाई वाढवण्याचं धोरण”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More