बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“तो दिवस लांब नाही, राज्यात भाजपचं सरकार येणारच”

नंदूरबार | महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून राज्यात भाजपचं सरकार येणार, असं भाजप नेते सात्त्याने म्हणत आहेत. अशातच आता केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि रामदास आठवले (Ramdas Athavale) आणि चंद्रकांत पाटील यांनी भाजपचं सरकार येणार असा दावा केला होता. अशातच आता विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी देखील भाजपचं सरकार येणार असल्याचं संकेत दिले आहेत.

राज्यात भाजपचे सरकार येणारच. तो दिवस लांब नाही, असं प्रविण दरेकर म्हणाले आहेत. फक्त तो दिवस आज येईल की उद्या याबाबत आम्ही भविष्यवाणी करणार नाही, असंही दरेकर म्हणाले आहेत. प्रविण दरेकर यांनी देखील राणे आणि आठवले यांच्या वक्तव्यानंतर दरेकरांनी सुचक वक्तव्य केलं आहे.

प्रविण दरेकर नंदूरबारच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर आणि नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला आहे. आपला अनिल देशमुख होईल, अशी भीती आता नवाब मलिकांना वाटतीये, असा टोला दरेकरांनी मलिकांना लगावला आहे.

दरम्यान, सरकारने दडपशाही करून आंदोलन चिरडू नये. शरद पवारांनी विलिगीकरणाचा दिलेला शब्द पाळावा, मग आम्ही सरकारचं अभिनंदन करू, असंही दरेकर म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या-

नव्या कोरोना व्हेरियंटची दहशत; यंत्रणांना दिले सज्ज राहण्याचे आदेश!

“नारायण राणेंचा मार्च कुठला ते शोधावं लागेल, पाच वर्ष होतील पण…”

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मोदी सरकारने घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

जगाला टेन्शन देणारा ‘ओमिक्रॉन व्हेरियंट’ आहे तरी काय?; वाचा सविस्तर

बापानं केलं असं काही की, अरबाज मर्चंटने मारला डोक्यावर हात; पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More