Top News मुंबई

“शिवसेनेने गेल्या अनेक वर्षात मुंबईचं वाटोळं करण्याचं पाप केलंय”

मुंबई | विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधलाय. शिवसेनेनेच गेल्या अनेक वर्षात मुंबईचं वाटोळं करण्याचं पाप केलं असल्याचं दरेकर म्हणालेत.

प्रवीण दरेकर म्हणाले, “गेल्या 24 वर्षांपासून मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता असून हजारो कोटींचे अर्थसंकल्प झाले. मात्र अजूनही मुंबईत पाणी तुंबण्याचा प्रश्न तसाच आहे. त्यातप्रमाणे दोन हजार कोटींचा प्रकल्प असून देखील अनेक ठिकाणी कचरा दिसतो.”

“गेली 24 वर्षे मुंबई महापालिकेची सत्ता असताना शिवसेनेने केवळ सत्तेचा उपभोग घेतला. वर्षोनुवर्षे सत्तेवर असूनही मुंबईचे प्रश्न मात्र कायमच आहेत,” अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केलीये.

“त्याचप्रमाणे मराठी शाळांची दुरवस्था होत असून या मराठी शाळा बंद पडतायत ते शिवसेनेचं पाप आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा आता सेनेला विसर पडलाय,” असंही दरेकर म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

ममता बॅनर्जींचं पंतप्रधान मोदींना पत्र; ‘ही’ केली मागणी

“अटलजी आणि मोदींच्या जीवावर निवडून येऊन पद उपभोगली, तेच आता इतरांना शिकवत आहेत”

पालघर हत्याकांडाची सीबीआय चौकशी करा- नारायण राणे

वीजबिलांवरून राज्य सरकारने जनतेचा विश्वासघात केलाय- देवेंद्र फडणवीस

ममता बॅनर्जींचं पंतप्रधान मोदींना पत्र; ‘ही’ केली मागणी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या