बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“महाराष्ट्र सरकारने पळवाट न काढता निदान 15 दिवस तरी अधिवेशन बोलवावं”

मुंबई | मराठा आरक्षण मुद्दा तसेच कोरोना यांसारख्या महत्त्वाच्या सामाजिक आणि आर्थिक विषयांवर चर्चा होण्याची गरज असल्याचं मत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केलं आहे. दरम्यान, राज्य सरकारने जास्तीत जास्त दिवसांसाठी अधिवेशन बोलवावं, अशी देखील मागणी त्यांनी केली आहे.

महाराष्ट्रातील आर्थिक आणि सामाजिक विषयांवर अधिवेशनात चर्चा होण्याची सध्या गरज असल्याचं प्रवीण दरेकर यांनी बोलून दाखवलं. तसेच राज्य सरकारने आता कोणतीही पळवाट न काढता कमीत कमी 15 दिवस अधिवेशन बोलवावं, अशी मागणी त्यांनी केली आहे.

भाजप नेते व विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केलेल्या या मागणीवर सरकार नेमकं काय पावले उचलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच राज्यासमोर महत्त्वाचे विषय असल्याने अधिवेशन होणं गरजेचं असल्याचंही प्रवीण दरेकर यांनी बोलून दाखवलं आहे.

सरकारने आता पळवाट न काढता निदान 15 दिवस अधिवेशन बोलवा, अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केल्याने सरकारच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सध्या महाराष्ट्रात अनेक मोठ्या घटना घडत आहेत. अशातच कोरोना आटोक्यात आला असला तरी राज्यासमोर अनेक मोठे प्रश्न आ वासून उभे आहेत. त्यावरूनच अधिवेशनात चर्चा होण्याची गरज असल्याचं मत विरोधी पक्ष नेत्यांनी व्यक्त केलं आहे.

थोडक्यात बातम्या –

सोनिया गांधी ॲक्शन मोडमध्ये, बोलावली महत्वाची बैठक; ‘या’ गोष्टींवर होणार चर्चा?

अखेर प्रतिक्षा संपली! ‘बिग बाॅस मराठी 3’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

‘झाडे लावा आणि जास्त मार्क मिळवा’, ‘या’ ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी सुरु केली अनोखी योजना

काय सांगता! आता केवळ आवाजाने चार्ज होणार MIचा स्मार्टफोन

जगातील सर्वाधिक लोकप्रिय वेबसीरिज म्हणून ‘द फॅमिली मॅन-2’च्या नावे नवा विक्रम

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More