बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…तर तुमच्या मंत्रिमंडळात किती कट्टर शिवसैनिक आहेत?”

मुंबई | काल शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबई येथील षण्मुखानंद सभागृहात पार पडला. या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर सडकून टीका केली. त्यातच मुख्यमंत्र्यांच्या भाषणावरून भाजप नेत्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी ‘भाजप सत्तापिपासू आहे, अशी टीका करणं नेमक्या कोणत्या शिवसेनेच्या संस्कृतीत बसतं?’, असा प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारला आहे.

‘सत्तेसाठी मांडीला मांडी लावून आचार-विचार सर्व बाजूला ठेवून शिवसेना सत्तेचा उपभोग घेत आहे आणि भाजपवर सत्तेसाठी आरोप करत आहे’, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी करत मुख्यमंत्र्यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणात हिंदुत्व व मराठी या विषयावरील आपली भूमिका स्पष्ट करत हा विषय पुन्हा उपस्थित करावा लागला, हे उल्लेखनीय आहे, असं म्हणून दरेकरांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

प्रवीण दरेकर यांनी पुढे बोलताना असं म्हटलं की, ‘पंढरपूरच्या विधानसभा पोटनिवडणुकीतील विजयी उमेदवार समाधान आवताडे व देगलूरच्या पोटनिवडणुकीतील भाजपने तिकीट दिलेले सुभाष साबणे हे उपरे आहेत, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं खरं, पण असं म्हणत असाल तर तुमच्या मंत्रिमंडळात किती कट्टर शिवसैनिक आहेत? शिवसेना स्थापनेच्या वेळी असलेले निष्ठावान शिवसैनिक तुमच्या मंत्रिमंडळात आहेत का?’, असा प्रश्न विचारला आहे.

दरम्यान, शिवसेनेचे मंत्री उदय सामंत, शंकरराव गडाख, अब्दुल सत्तार तसेच खासदार प्रियंका चतुर्वेदी या मंडळीही उपरीच आहेत ना?, असाही प्रश्न यावेळी दारेकरांनी उपस्थित केला आहे. काल झालेल्या दसरा मेळाव्यानंतर शिवसेना विरुद्ध भाजप असा वाद पुन्हा एकदा महाराष्ट्रातील जनतेला पाहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या

“आता आत्मविश्वासाने सांगतो आम्हाला उद्धवजींमध्ये राहुलजी अगदी स्पष्टपणे दिसत आहेत”

‘भाजपवर काहीही बोला पण संघ पद्धतीवर नख लावलं तर…’, उद्धव ठाकरेंना ‘या’ नेत्याचा इशारा

चेन्नईच सुपर ‘किंग’! चौथ्यांदा पटकावला आयपीएलचा किताब

“बाबरी मस्जिद पाडण्यासाठी एक तरी शिवसैनिक होता का?”

2021 आयपीएलचा अंतिम सामना खेळत धोनीने केलाय हा भीम पराक्रम, जाणून घ्या!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More