भाजपचा ‘हा’ बडा नेता होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री?, भाजप नेत्याने सांगूनच टाकलं

Maharashtra Election 2024 | आज 23 नोव्हेंबर रोजी सकाळपासूनच विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. राज्यात महाविकास आघाडी विरूद्ध महायुती असा थेट सामना झाला असून यात कोण बाजी मारणार हे स्पष्ट होत आहे. त्यामुळे सर्वांचंच लक्ष आता निकालाकडे असणार आहे.

याशिवाय महाराष्ट्र कोणाचा?, महाराष्ट्रला मुख्यमंत्री कोण मिळणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान याचवेळी भाजपचे प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी याबाबत मोठा खुलासा केला आहे.

काय म्हणाले दरेकर?

राज्यात मतमोजणीला सुरुवात झाली असून महायुती आणि मविआ यांच्यामध्ये काटे की टक्कर पहायला मिळत आहे. महायुतीने मतांचा अकडा पार केला असून भाजपचे कार्यकर्ते जल्लोष साजरा करताना दिसत आहेत. दरम्यान, यावेळेस भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी एक खुलासा केला आहे. माध्यमांशी बोलत असताना दरेकर (Pravin Darekar) यांनी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा भाजपचा असणार असल्याचं म्हटलं आहे.

फडणवीस होणार मुख्यमंत्री?

प्रवीण दरेकर यांनी माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली. दरेकर म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी जे धर्मयुद्ध पुकारलं होतं त्यासाठी हम सब एक है चा नारा जनतेनं मान्य केला. केंद्रात भाजपचं सरकार, महाराष्ट्रात भाजपचं सरकार आल्यास राज्याचा विकास होईल, यामुळं अधिक मतदान झालं.

त्यामुळे, विजयाची आम्हाला पूर्णपणे खात्री होती. जनता इतका आशीर्वाद देईल, असं वाटलं नव्हतं. लाडक्या बहिणींना सलाम करतो, त्यांच्यापुढं नतमस्तक होतो, असं देखील दरेकर म्हणाले. एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी आहे. महायुतीचा मुख्यमंत्री होईल. जी पार्टी मोठी आहे, त्यांचा मुख्यमंत्री होतो. भाजप 125 जागांजवळ गेली आहे, त्यामुळं भाजपचा मुख्यमंत्री होणार आहे. त्यामुळं देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, असं प्रविण दरेकर यांनी वक्तव्य केलं आहे.

News Title : pravin darekar reveals cm of maharashtra

महत्त्वाच्या बातम्या-

मविआचा राज्यातून सुपडासाफ?, एकट्या भाजपनेच गाठली शंभरीपार

प्राजक्ता माळीने चाहत्यांना दिली गुड न्यूज, ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

‘एक हाती सत्ता द्या’ म्हणणाऱ्या मनसेने अद्याप भोपळाही फोडला नाही?

निकालाआधीच महायुतीत मुख्यमंत्रिपदावरून रस्सीखेच?, ‘हा’ नेता म्हणाला मुख्यमंत्री आमचाच

‘राज’पुत्र अमित ठाकरे आघाडीवर की पिछाडीवर?, माहीमचा निकाल पाहण्यासाठी ‘इथे’ क्लिक करा