बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आव्हाडांनी रश्मी शुक्लांवर केलेल्या गंभीर आरोपांवर प्रविण दरेकर म्हणाले…

मुंबई | फोन टॅपिंग प्रकरणात अडचणीत आलेल्या आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेेंद्र आव्हाडांनी ट्विट करत आरोप केला होता. सध्या राज्य सरकारने रश्मी शुक्ला यांना धारेवर धरलं आहे. आता या प्रकरणी रश्मी यांचा बचाव करण्यासाठी भाजपने हस्तक्षेप केला आहे.

विधान परिषदेेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी मुंबई येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना अप्रत्यक्षरित्या रश्मी यांची पाठराखण केली. दरेकर यांनी माध्यमांशी बोल्याप्रमाणे राज्य सरकार चौकशीच्या भाषेखाली रश्मी शुक्ला यांच्यावर दबाव आणू पाहत आहेत. एवढचं नाही तर सरकार चौकशीची इतकी घाई का करत आहे?, असा सवाल देखील दरेकरांनी यादरम्यान केला आहे.

रश्मी शुक्ला यांची अप्रत्यक्षपणे बाजू मांडत सरकारने प्रथम पोलीस दलातील बदल्यांच्या रॅकेटची चौकशी करावी आणि त्या चौकशीत रश्मी शुक्ला यांची चुक असेल तर ती समोर येईल, असं दरेकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, रश्मी शुक्ला यांनी अपक्ष आमदार राजेंद्र यड्रावकर यांना धमकवल्याचा आरोप जितेंद्र आडाव्हांनी केला होता. यावर कोणताही आमदार एवढा कमकुवत नसून कुठलाही नेता अशाप्रकारे बळी पडत नसल्याचं प्रविण दरेकरांनी म्हटलं आहे. एवढचं नाही तर प्रविण दरेकरांच्या बोलण्याला काही तथ्य नसल्याचं देखील दरेकरांनी म्हटलं आहे. त्यामुळे यावर जितेंद्र आव्हाड काय प्रत्युत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या-

‘या’ कारणाने महाविकास आघाडीच्या नेत्यांची राज्यपालांसोबत ठरलेली आजची भेट झाली रद्द!

संजय राऊत हे शरद पवारांचे प्रवक्ते आहेत का- नाना पटोले

“तक्रार करणाऱ्यांचा आणि माझा इतिहास तपासा, गेली 25 वर्ष मी संसदेच्या क्षेत्रामध्ये काम करतोय” – अरविंद सावंत

मुकेश अंबानींच्या घराजवळ स्काॅर्पिओनंतर त्याच ठिकाणी दुचाकी सापडल्यानं खळबळ

मनसुख हिरेन यांचा सचिन वाझेंच्या गाडीत बसतानाचा व्हिडीओ आला समोर, पाहा व्हिडीओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More