बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“भरकटलेली वक्तव्य करणाऱ्या संजय राऊतांना नेमकं कुठं जायचं आहे?”

मुंबई | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी रविवारी पुणे पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील शिवसेनेच्या मेळाव्यात आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीने साथ न दिल्यास भाजपसोबत जाण्याचा इशारा दिला आहे. आता याच मुद्यावरुन भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राऊतांवर घणाघात केला आहे.

संजय राऊत हे पार गोंधळून गेले आहेत. त्यांची वक्तव्य ही भरकटलेली आहेत. यामुळेच तर त्यांनी राष्ट्रवादीने साथ न दिल्यास भाजपसोबत जाण्याचे संकेत दिले आहेत. राऊतांना नेमकं काय करायचं आहे, हेच समजत नाही, असा टोला प्रविण दरेकर यांनी लगावला आहे.

तसेच शिवसेनेमध्ये राष्ट्रवादीबद्दल संतापाचं वातावरण आहे. ते आज पुण्यात संजय राऊतांनी केलेल्या भाषणामध्ये दिसून आलं. राष्ट्रवादीबद्दल असलेल्या संतापामुळे तर राऊत असं बोलले, असं देखील दरेकर यांनी यावेळी म्हटलं आहे.

दरम्यान, एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीमध्ये जाऊन भेट घेतली. तर दुसरीकडे संजय राऊत राष्ट्रवादीला इशारे देत आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्क वितर्क लावले जात आहेत.

थोडक्यात बातम्या –

HDFC बँकेचा मोठा निर्णय; ग्रामीण भागातील तरुणांना नोकरीची संधी

काँग्रेसला दिलेला शब्द फडणवीसांनी पाळला; राज्यसभा पोटनिवडणुकीतून भाजपची माघार

धर्मांतराचं रॅकेट चालवणाऱ्या तरुणाला नाशिकमधून अटक; तपासात धक्कादायक माहिती समोर

बिकीनी घालून तरुणाचा भररस्त्यात भन्नाट डान्स, पाहा व्हिडीओ

कोरोना लसीला विरोध करणाऱ्या ‘या’ माॅडेलची मृत्यूशी झूंज; लोकांना केलं लस घेण्याचं आवाहन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More