कोल्हापूर महाराष्ट्र

“राजू शेट्टी आता शेतकरी नेते राहिले नाहीत, त्यांच्यात हे सत्य स्वीकारण्याचं धाडस नाही”

कोल्हापूर | कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या राजू शेट्टी यांच्यावर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी जोरदार हल्ला चढवला आहे.

राजू शेट्टी हे पूर्वी शेतकरी नेते म्हणून ओळखले जायचे. मात्र, आता त्यांना राजकारणात जास्त रस आहे. त्यामुळे राजू शेट्टी यांची शेतकरी नेते ही ओळख पुसली गेली आहे, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली.

राजू शेट्टी हे अजूनही स्वत:ला शेतकरी नेते समजतात. हे खूळ त्यांच्या डोक्यात आहे. सत्य स्वीकारण्याचे धाडस राजू शेट्टी यांच्यात नाही. राजू शेट्टी यांच्यावर शेतकऱ्यांचा विश्वास राहिलेला नाही. शेट्टी यांचे लक्ष्य आता केवळ विधानपरिषदेतील आमदारकी हेच आहे. यासाठी आता राजू शेट्टी काय करतात, हे पाहावे लागेल, असं दरेकर म्हणाले.

राजू शेट्टी कोणत्या जगात वावरत आहेत? शेट्टी यांचा बालेकिल्ला कधीच उद्ध्वस्त झाला आहे. या किल्ल्याचे बुरुज, चिरे आणि वीटा विखुरल्यामुळे त्याची डागडुजी करण्याची गरज असल्याचं दरेकर यांनी म्हटलंय.

थोडक्यात बातम्या-

“निवडणुका आल्या किंवा भाजप अडचणीत आल की शेतकर्‍यांच्या खात्यात लगेच पैसे जमा होतात”

ड्रग्ज प्रकरणी अर्जुन रामपालवर अटकेची टांगती तलवार?

‘माझ्यावर दडपण होतं पण जर मी खचलो तर…’; उद्धव ठाकरेंनी सांगितला ‘त्या’ दिवसांमधला अनुभव

ठरलं! पुण्यात ‘या’ तारखेपासून सुरु होणार 9 ते 12वीची शाळा

मराठी मालिकांमध्ये सोज्वळ अभिनयासाठी फेमस; आता इन्स्टावर टाकले बिकिनीतले फोटो

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या