Top News महाराष्ट्र मुंबई

मोदी जनतेचं मनोबल वाढवत आहेत, त्यांच्यावर टीका करणं चुकीचं- प्रवीण दरेकर

मुंबई |  पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात कोरोनाच्या कठीण काळात उत्सवी वातावरण तयार करत आहेत, अशी टीका शिवसेनेने केली होती. त्यांच्या या टीकेला भाजपने प्रत्युत्तर दिलं आहे. मोदीजी कोरोनाविरोधातल्या लढाईत जनतेचं मनोबल वाढवत आहेत. त्यांच्यावर राजकीय अभिनिवेषनातून टीका करणं योग्य नाही, असं भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधानांच्या भूमिकेवर राजकीय अभिनिवेषातून टीका-टिप्पणी करणं अत्यंत दुर्दैवी आहेच, पण करोनाविरुद्धच्या लढ्याची तुलना ‘पानिपत’शी करणं त्याहून चुकीचं आहे. त्यामुळं लोकांमध्ये नैराश्याची भावना पसरू शकते, असं दरेकर म्हणाले.

पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर लोकांनी सोशल डिस्टन्सिंगची शिस्त मोडली. रस्त्यावर येऊन मशाली पेटवल्या. मोदींची भूमिका लोकांपर्यंत नीट पोहोचत नसावी किंवा मोदींनाच देशात असं वातावरण हवं असावं, अशी टीका आजच्या सामनामधून करण्यात आली आहे. त्याच टीकेला दरेकर यांनी उत्तर दिलं आहे.

दरम्यान, संजय राऊत आणि शिवसेनेची ही टीका खेदजनक आहे. या कठीण काळात त्यांच्याकडून अशा टीकेची अपेक्षा नसल्याचं ते म्हणाले.

ट्रेंडिंग बातम्या-

… तर गंभीर परिणाम भोगावे लागतील; डोनाल्ड ट्रम्प यांची भारताला धमकी

14 एप्रिलला लॉकडाऊन संपणार का?; आरोग्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य

महत्वाच्या बातम्या-

आपल्याला हनुमानासारखी पर्वत उचलायची नाहीत, जयंतीला घरीच थांबा- अजित पवार

मोदी सरकारचं दुसरं आर्थिक पॅकेज; या क्षेत्रांना मिळणार मोठा दिलासा

चालून थकलो आहे मला घ्यायला या… बीडच्या तरूणाचा वडिलांबरोबर अखेरचा संवाद अन्….

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या