बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आणखी किती बळी हवेत म्हणजे नॅशनल न्यूज होईल- प्रविण दरेकर

मुंबई | विरार पश्चिम याठिकाणी विजय वल्लभ या रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाला आग लागली आहे. सेंट्रलाईज्ड एसीचा स्फोट होऊन ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. या आगीत 13 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. यावर माध्यमांशी बोलताना विरारमधील घटना ही काही नॅशनल न्यूज नाही, असं आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर संताप व्यक्त केला जात आहे.

टोपे यांच्या या वक्तव्याचा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी जोरदार समाचार घेतला आहे. आणखी किती बळी हवेत म्हणजे नॅशनल न्यूज होईल, असा संतप्त सवाल दरेकर यांनी केला आहे. सरकार आणि त्यांच्या मंत्र्यांच्या संवेदना मेल्या आहेत. त्यामुळेच हे लोक बेताल बडबड करत आहेत, अशी टीका दरेकरांनी केली आहे.

राज्यातील आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे उडाले आहेत. आरोग्य व्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्याऐवजी यांना टीव्हीवर चमकायचं पडलं आहे, अशी टीका प्रविण दरेकर यांनी राजेश टोपेंवर केली आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील सर्व कोविड केंद्रामधील ऑक्सिजन आणि फायर ऑडिट तातडीने करण्यात यावं. यासाठी या श्रेत्रातील तज्ज्ञांची मदत घेण्यात यावी. तसेच महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंना घरी बसवलं पाहिजे, असं भाजप नेते किरीट सोमय्या यांनी म्हटलंय.

थोडक्यात बातम्या- 

मनसुख हिरेन मृत्युप्रकरणी एनआयएची मोठी कारवाई; पोलीस निरीक्षक सुनिल माने यांना अटक

यंत्रणांवर ताण आहे, हे मान्य पण म्हणून या घटनांमधून काही बोध घ्यायचाच नाही असं नाही- राज ठाकरे

अत्यावश्यक सेवेतील सर्वांना मोफत सेवा देणाऱ्या रिक्षाचालकाचं रोहित पवारांकडून कौतुक, म्हणाले…

आता ऑक्सिजनचा प्रश्न सुटणार?; ‘या’ बड्या कंपनीनं दिली मोठी ऑफर

पोटावर झोपल्यानं खरंच ॲाक्सिजनची पातळी वाढते का?; जाणून घ्या काय खरं

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More