बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“शरद पवारांच्या घरावरील हल्ल्यामागं संजय राऊतांचा हात”

मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर राज्यात राजकारण पेटलं आहे. भाजप आणि महाविकास आघाडीचे नेते एकमेकांवर जोरदार टीका करत आहेत. अशातच विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (BJP Leader Pravin Darekar) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

संजय राऊत हे भ्रमिष्ट झालेले नेते आहेत. त्यांच्या सर्व विषयांवरून लक्ष विचलित करण्यासाठी हा प्रकार राऊत यांनी केला आहे. काही दिवसांपासून संजय राऊत वैफल्यग्रस्त आहेत, असं दरेकर म्हणाले आहेत. वारंवार त्यांच्या भूमिका बदलत आहेत, असंही दरेकर म्हणाले आहेत.

मला तर संशय येतो की संजय राऊत यांनी नियोजित पद्धतीने हा प्रकार केला आहे. संजय राऊत यांचा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या बंगल्यावरील हल्ल्यामागं हात असावा, असं खळबळजनक वक्तव्य दरेकर यांनी केलं आहे.

दरम्यान, मीडियाला कळते आणि मीडियावाले त्या ठिकाणी पोलिसांच्या अगोदर जातात. मग पोलीस काय झोपा काढत होते का?, असा सवालही दरेकरांनी उपस्थित केला आहे.

थोडक्यात बातम्या – 

“पवार कुटुंबानं महाराष्ट्राला विकत घेतलं आहे का?”; निलेश राणेंचा खोचक सवाल

“…तर धोनीच्या संघाचं काही खरं नाही”; दिग्गज क्रिकेटपटूचं मोठं वक्तव्य

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाबाबत गृहमंत्र्यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

“उदयनराजे संध्याकाळी कोणत्या परिस्थितीत बोलले आहेत ते तपासावं लागेल”

गुणरत्न सदावर्तेंच्या पत्नीने शरद पवारांवर केलेल्या आरोपाने खळबळ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More