बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“एकाला एक दुसऱ्याला दुसरा न्याय नको, धनंजय मुंडेंचाही राजीनामा घ्या”

मुंबई | शिवसेना नेते आणि मंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यानंतर आता भाजपकडून सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडेंनंतर आता विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केलीये.

महाविकास आघाडीतील एकाला एक आणि दुसऱ्याला दुसरा न्याय नको. त्यामुळे मुंडे यांनी राजीनामा दिलाच पाहिजे, असं प्रविण दरेकर यांनी म्हटलं आहे. ते विधानभवनात माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. विरोधी पक्ष, जनता आणि मीडियाचा दबाव वाढला नसता तर त्यांनी राजीनामा घेतला नसता. पण उशिरा का होईना नैतिकतेच्या आधारे मंत्र्याचा राजीनामा घेतला. आता पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याची मागणी केली आहे. पंकजा यांची मागणी रास्तच आहे, असं प्रविण दरेकरांनी म्हटलं आहे.

धनंजय मुंडे प्रकरणाचं समर्थन करू शकत नाही. धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा ही आमच्या पक्षाचीही मागणी आहे. राजकारणात काय पायंडे चाललेत ते स्त्रियांच्या दृष्टीने दुर्दैवी आहेत. झगडणाऱ्या स्त्रीसाठी, चांगला काम करणाऱ्या स्त्रीसाठी एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय, असं भाजप नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या.

दरम्यान, पूजा चव्हाण प्रकरणामुळे अडचणीत आलेले शिवसेना मंत्री संजय राठोड यांना विरोधी पक्षाच्या वाढत्या दबावानंतर अखेर राजीनामा द्यावा लागला. पूजा चव्हाण प्रकरणी भाजपने आक्रमक भूमिका घेतल्याचं पहायला मिळालं होतं. संजय राठोड यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपने लावून धरली होती. तसेच याप्रकरणावरून भाजपने सरकारला सळो की पळो करून सोडलं होतं.

थोडक्यात बातम्या-

धक्कादायक! भाजपच्या ‘या’ खासदाराचं कोरोनामुळे निधन

कार्तिक आर्यन समोर येताच तिने केलं असं काही की…; व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

वाढत्या कोरोनाच्या धोक्यामुळे ‘या’ जिल्ह्यातील सर्व शाळा बंद

भाजपच्या ‘या’ बड्या नेत्यांविरोधात अदखलपात्र गुन्हा; जाणून घ्या काय आहे प्रकरण

चोरट्या चीनचा रडीचा डाव; कोरोना लस बनवणाऱ्या भारतीय कंपन्या चीनच्या निशाण्यावर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More