बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“ठाकरे सरकार पोकळ आणि बहिरं असून या सरकारला मराठा समाजाप्रती आस्था नाही”

मुंबई | मराठा तरुणांच्या समस्या ऐकायला ठाकरे सरकारला वेळ नाही. सरकार पोकळ आणि बहिरं आहे. या सरकारला मराठा समाजाप्रती आस्था नसल्याची घणाघाती टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

मराठा भावनांचा उद्रेक होऊ शकतो. मराठा समाजाला आरक्षण नाही. सरकार ऐकत नाही. सरकारने केसाने गळा कापला असल्याची टीकाही दरेकर यांनी केली आहे.

मराठा समाजाच्या तरुणांचं गेल्या 27 दिवसांपासून मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन सुरु आहे. मात्र अजूनही सरकारने यावर काही निर्णय घेतला नसून आंदाेलनाची दखलही घेतलेली नाही.

दरम्यान, कलमाअंतर्गत नियुक्त्या देता येतील. मात्र सरकार का घाबरतंय? कायदा वैध तर कारवाई अवैध कशी? कायद्याच्या अंमलबजावणीसाठी न्यायालयात जाण्याचा सल्ला देणं म्हणजे हा न्यायालयाचा आणि विधीमंडळाचा अवमान असल्याची टीका फडणवीसांनी केली आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

महाद्याविलयीन निवडणुका पुन्हा व्हाव्यात का?; शरद पवार म्हणाले….

दिल्लीतील नेत्यांच्या नाराजीमुळे फडणवीसांचं विरोधी पक्षनेतेपद धोक्यात- मिटकरी

महत्वाच्या बातम्या-

“तृप्ती देसाईंनी अकोल्यात येऊन दाखवावं, मुंडन करुन परत पाठवू”

“…तर पक्षाच्या नावावर मिळालेली पेंशन आणि सवलती स्वाभिमान पूर्वक सोडाव्यात”

मुलगा झाला दुसऱ्यांदा आमदार पण वडील अजूनही चालवतात पंक्चरचं दुकान!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More