बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“भाजपनेच मराठा आरक्षण दिलं आणि संभाजीराजेंना खासदारही केलं”

मुंबई | अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि कंगणा राणावत या बॉलिवूड तारकांना पंतप्रधान मोदी भेट देतात. मात्र अनेकदा विनंती करूनही संभाजीराजे छत्रपती यांना मोदींनी भेट दिली नाही. हा महाराष्ट्राचा अवमान असल्याची टीका काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली होती. याच पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

मराठा समाजाला भाजपने आरक्षण दिले आणि छत्रपती संभाजीराजे यांना खासदारही भाजपनेच केले. त्यामुळे मराठा आरक्षण आणि छत्रपतींच्या सन्माविषयी कोणीही भाजपला शिकवण्याची गरज नसल्याचं प्रविण दरेकर यांनी म्हटलं आहे. मुंबईत ते माध्यमांशी बोलत होते.

1999 पासून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांची पंधरा वर्षे राज्यात तर दहा वर्षे केंद्रात सत्ता होती. त्यावेळी मराठा समाजाला आरक्षण देण्याऐवजी मराठा कार्यकर्त्यांना मारझोड करण्याचं काम तुमच्या सरकारनं केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या सरकारनेच मराठा समाजाला आरक्षण दिलं आणि ते हायकोर्टातही टिकवलं. आमचं सरकार होतं तोपर्यंत सुप्रीम कोर्टातही त्याला स्थगिती आली नसल्याचं प्रविण दरेकर म्हणाले.

दरम्यान, केंद्रामध्ये सत्ता आल्यानंतर भाजपने छत्रपती संभाजीराजे यांना राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा खासदार केले. त्यापाठोपाठ प्रयागराज (अलाहाबाद) येथे झालेल्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी संभाजीराजेंचा सन्मान पक्षाच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांसमोर भर सभागृहात केला अस्याचं दरेकर यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या- 

‘या’ शिवसेना आमदाराची गाडी त्यांच्याच घरासमोर पेटवण्याचा प्रयत्न

आयपीएलच्या इतिहासातील सर्वात रोमांचक सामन्यावर राजस्थान राॅयलचं मजेशीर ट्विट

‘देवा, घड्याळाचे काटे पुन्हा उलटे फिरव…’; विलासरावांच्या जयंतीनिमित्त रितेशची भावूक पोस्ट

‘रूग्ण तडफडेल, तरी तुम्हाला अॅम्ब्युलन्स मिळणार नाही’; अॅम्ब्युलन्स मालकाची अरेरावी

कोरोनामुळे कुटुंबातील सदस्य गमावलेल्या पदाधिकाऱ्यांचे राज ठाकरेंकडून सांत्वन, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More