बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मनमोहन सिंग यांनी अर्थव्यवस्थेमध्ये दहा वर्षात जी प्रगती केली नाही ती मोदींनी पाच वर्षात केली”

मुंबई | अर्थव्यवस्था गतिमान होण्यासाठी एका नव्या मनमोहन सिंगांची गरज आहे. किमान पंतप्रधान मोदी यांनी रवींद्रनाथ टागोरांच्या भूमिकेतून प्रे. रुझवेल्टच्या भूमिकेत शिरणं महत्त्वाचे आहे, असं शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊतांनी सामनामध्ये म्हटलं होतं. यावरून भाजप नेते प्रविण दरकेर यांनी प्रत्युत्तर देताना राऊतांना टोला हाणला आहे.

अर्थव्यवस्थेच्या ज्ञानाची संजय राऊत यांनी उजळणी करण्याची आवश्यकता आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये मागील दहा वर्षात जी प्रगती करु शकले नाहीत, ती प्रगती मोदींनी दीडपट गतीने गेल्या पाच वर्षांमध्ये केली. मोदींनी देश अर्थव्यवस्थेत प्रगतीकडे नेला याचं भान संजय राऊतांना नाही  किंवा ते समजून न उमजल्यासारखं करत आहेत, असं प्रविण दरेकर यांनी म्हटलं आहे.

कोरोनाच्या काळात जगाची अर्थव्यवस्था कोलमडलेली असताना मोदी यांनी देशाचा विकासदर फक्त वजा 8% पर्यंत ठेवला. तसेच मोदींनी अर्थव्यवस्था सक्षम ठेवण्यासाठी वीस लाख कोटींचं पॅकेज दिलं. मला वाटतं संजय राऊत यांनी अशा प्रकारचा फुकटचा सल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना द्यावा. त्यामळे महाराष्ट्रातल्या गटांगळ्याच काय त्यापेक्षा दुर्दैवी असणाऱ्या अर्थव्यवस्थेला नीट गती देता येईल, असंही दरेकर म्हणाले.

दरम्यान, राऊत केंद्रीय आणि देशपातळीवरचे नेते असल्यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेविषयी त्यांना चिंता करावीशी वाटत नाही, असा आरोपसुद्धा दरेकर यांनी राऊत यांच्यावर केला आहे.

थोडक्यात बातम्या-

विश्वासघात झाला आणि आम्ही विरोधक झालो- चंद्रकांत पाटील

ती लिव्ह इन रिलेशनमधून बाहेर पडली, फोनही उचलेना, त्यानं केलं अत्यंत किळसवाणं कृत्य!

पुण्यात बनणाऱ्या कोविशिल्ड लसीची किंमत परदेशात कमी पण भारतात सर्वाधिक!

सुजय विखेंनी त्या बॅाक्समधून नक्की काय आणलं?, रुपाली चाकणकरांना मोठी शंका

राष्ट्रवादीचा आमदार अन् पुतण्यामधील प्रकरण, ‘या’ कारणामुळे कांड घडल्याची जोरदार चर्चा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More