बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“शिवसेनाप्रमुखांना राणेंची उंची माहित होती, म्हणूनच त्यांना मुख्यमंत्रिपदी बसवलं”

मुंबई | नारायण राणेंना सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग खात्याचं मंत्रिपद देण्यात आलं आहे. पण त्यांना जे पद मिळालं त्यापेक्षा त्यांची उंची मोठी आहे. तरीही आमच्या राणेंना शुभेच्छा, अशा शब्दात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राणेंना शुभेच्छा दिल्या होत्या. यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी राऊतांना टोला हाणला आहे.

नारायण राणेंना काही मिळालं तरी संजय राऊत यांना ते छोटच वाटणार याची कल्पना आम्हाला आहे. आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना राणे साहेबांची उंची माहीत होती. त्यामुळेच त्यांनी राणे साहेबांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी बसवलं होतं. परंतु आता संजय राऊत यांना राणे दोषाची काविळ झाली आहे, असं म्हणत प्रविण दरेकर यांनी राऊतांवर निशाणा साधला.

राणेंना मिळालेलं खातं छोट आहे की मोठं?, हे येणाऱ्या काळामध्ये राणेसाहेब त्यांच्या कार्यपध्दतीतुन दाखवून देतील. त्यांना कोणतही खातं दिलं असतं तरी त्या खात्याला वजन प्राप्त करत जनतेला मदत करायचं काम ते नक्की केलं असतं असंही दरेकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, भाजपने त्यांना केंद्रात मंत्रिपद दिलं आहे. बघुया ते काय करतात. हा शह वगैरे काही नाही. कोण कुणाला अंगावर घेतं ते बघा तुम्ही. कोकण आणि शिवसेना हे नेहमीच समीकरण राहिलं आहे. त्यामुळे कोकणचे लोक आणि शिवसेनेत कधीही अंतर पडणार नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं.

थोडक्यात बातम्या- 

‘तुम्हाला लाज वाटली पाहिजे’; भाजप नेत्याच्या ‘त्या’ ट्वीटवर उर्मिला मातोंडकर भडकल्या

अभिमानास्पद! पुण्याच्या चिमुकलीनं जागतिक विक्रम करत 3 रेकाॅर्ड बुकमध्ये नोंदवलं नाव

पुण्यातील शाळा सुरू करण्यास मिळाला हिरवा कंदील; दीड वर्षानंतर होणार शाळा सुरू!

रूपाली चाकणकरांच्या ‘बंटी-बबली’च्या टीकेला नवनीत राणांचं प्रत्युत्तर; म्हणाल्या…

“देशाला बरबाद करणाऱ्यांना केंद्रिय मंत्रिमंडळात ठेवलं आहे”

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More