बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“संजय राऊतांनी सगळी शिवसेना राष्ट्रवादीची बटीक म्हणून ठेवलीय”

मुंबई | विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी आणखी एकदा महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) टीकास्त्र डागलं आहे. तर यावेळी बोलताना राज ठाकरेंचा (Raj Thackeray) अयोध्या दौरा रद्द झाला नसून स्थगित झाला असल्याचंही दरेकर म्हणाले.

राष्ट्रवादी शिवसेना (Shivsena) आणि संजय राऊतांचा (Sanjay Raut) वापर प्रवक्ता म्हणून करत असल्याची टीकाही प्रवीण दरेकरांनी केली आहे. शिवसेनेचा राष्ट्रवादीची (NCP) बटीक असा उल्लेख करत दरेकरांनी टोलबाजी केली आहे.

महाविकास आघाडी सरकार बनवत असताना सगळी शिवसेना राष्ट्रवादीची बटीक म्हणून संजय राऊत यांनी ठेवली आहे, असा घणाघात दरेकरांनी केला आहे. त्यातून तुम्हाला काय मिळालं याचा अभ्यास त्यांनी करावा, असा टोला देखील दरेकरांनी लगावला आहे.

दरम्यान, दुसऱ्यांचे शहाणपण काढण्यापेक्षा आपल्याकडे लक्ष द्या,अशा खोचक शब्दात दरेकरांनी टीका केली आहे. राजकीय वर्तुळात अनेक मुद्दे गाजत असताना भाजप व महाविकास आघाडीकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत.

थोडक्यात बातम्या-

शिवसेनेकडून संजय राऊत सलग चौथ्यांदा राज्यसभेवर, ‘या’ दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करणार

“भाजप देशातील नाही तर जगातील सर्वात मोठा पक्ष”

‘तुम्ही म्हणाल तेव्हा जय श्री राम म्हणायला मी काही…’, सोनू निगमचं आणखी एक वादग्रस्त वक्तव्य

मोठी बातमी! सचिन वाझेंना न्यायालयाचा दणका

‘अयोध्या दौऱ्याचा भोंगा बंद…’; राष्ट्रवादीची मनसेवर खोचक शब्दात टीका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More