बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ व्हिडीओवर प्रविण दरेकरांची प्रतिक्रीया, म्हणाले…

मुंबई | महाराष्ट्रात कार्डेलिया क्रुझ ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने केलेल्या कारवाईचीच सर्वत्र चर्चा सुरू आहे. त्यातच या प्रकरणाला आता राजकीय वळण प्राप्त होत असल्याचं पाहायला मिळत आहे. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केले त्यामुळे हे प्रकरण आणखी तापलं.

संजय राऊतांनी या प्रकरणात आता उडी घेतली असून त्यांनी काल ट्विटर एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यावरून आता राजकीय वर्तुळात अनेक प्रतिक्रीया उमटत असताना पाहायला मिळत आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी या व्हिडीओवर प्रतिक्रीया देताना ‘केंद्र सरकार व तपास यंत्रणांना दोषी ठरवण्यासाठी दररोज पत्रकार परिषदा घेऊन ओढूनताणून प्रयत्न सुरू आहेत’, असं म्हटलं आहे.

सोशल मीडियावरील एका क्लिपद्वारे निष्कर्ष लावणं चुकीचं असल्याचं मत दरेकरांनी व्यक्त केलं आहे. तसेच आपण बोलत असलेल्या गोष्टी खऱ्या आहेत हे दाखवण्यासाठीच या गोष्टी बनवल्या तर जात नाहीत, अशा प्रकारचा संशय येतो, असंही त्यांनी यावेळी बोलताना म्हटलं आहे. संजय राऊतांनी 100 कोटींच्या लसीकरणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं.

दरम्यान, प्रविण दरेकर यांनी संजय राऊतांच्या प्रश्नावर उत्तर देताना जशी दृष्टी तशीच सृष्टी दिसणार, असं म्हटलं आहे. तसेच राऊतांना भाजपविषयी काविळ झाल्याने त्यांना सगळं पिवळंच दिसत असल्याचा खोचक टोलाही त्यांनी लगावला.

थोडक्यात बातम्या – 

पाकिस्तानने टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताची विजयाची परंपरा अखेर मोडीत काढली

“तरी नुकसान झालेला एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये”

“ईडी म्हणजे पान तंबाखुचं दुकान झालंय, समझनेवालों को इशारा काफी होता है”

“आरक्षण मिळू द्यायचं नाही आणि निवडणुकीत या मुद्द्याचा वापर करायचा”

“काँग्रेसची धुणीभांडी करणाऱ्यांनी मोठ्या बाता करू नये”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More