बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘पीक विम्याच्या बीड पॅटर्नमुळे सरकारचा फायदा’; दरेकरांचा गंभीर आरोप

मुुंबई | विधानपरिषदेत सादर केलेल्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेवर बोलताना विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी पीक विम्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बीड पॅटर्नचा विरोध केला.या बीड पॅटर्नमुळे राज्य सरकारचं चांगभलं होणार आहे, असा घणाघाती आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला.

बीड पॅटर्नच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फक्त 13 कोटी 42 लाख रुपये मिळाले असताना राज्य शासनाला यामध्ये 626 कोटी रुपये मिळणार आहेत. म्हणजेच बीड पॅटर्नमुळे राज्य सरकारचं चांगभलं होणार आहे. जे लाखो शेतकरी क्लेम सादर करू शकले नाहीत, त्यांना कोणत्याही प्रकारचा फायदा होणार नाही, असं दरेकरांनी म्हटलंय.

पीक विमा योजनेमध्ये या सरकारच्या काळात 138 लाख शेकऱ्यांचा पीक विमा काढण्यात आला होता. त्यापैकी 15 लाख शेतकऱ्यांना परतावा दिला गेला. जेवढी रक्कम कंपन्यांकडे जमा झाली त्यापैकी फक्त 18 टक्के रक्कम शेतकऱ्यांना मिळाली. या सरकारच्या कृपेमुळे शेतकऱ्यांचा फायदा होण्याऐवजी कंपन्यांना 4234 कोटी रुपयांचा फायदा झाला, असं प्रविण दरेकर म्हणाले.

दरम्यान, शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठ्या घोषणा केल्या. पण कोरडवाहू आणि बागायती शेतकऱ्यांना आतापर्यंत मदत देण्यात आली नसल्याचा आरोप दरेकर यांनी केला.

थोडक्यात बातम्या- 

दिलासादायक! महाराष्ट्रात आजही नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत घट, पाहा आकडेवारी

जेईई मेन परीक्षेच्या तिसऱ्या आणि चौथ्या परिक्षेच्या तारखा जाहीर

“दोन दिवसांत राज्याच्या हिताचं एवढं काम करणारं हे राज्यातील पहिलं सरकार”

‘सुपरमॅन’ चित्रपटाचे दिग्दर्शक रिचर्ड डोनर यांचं दुःखद निधन

आज देखील सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; वाचा ताजे दर

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More