प्रविण गायकवाडांच्या नावाची घोषणा होत नसल्याने संभाजी ब्रिगेडही वेटिंग मोडवर

पुणे | संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड हे पुणे लोकसभा मतदार संघातून काँग्रेसचे संभाव्य उमेदवार आहेत. मात्र त्यांची उमेदवारी अद्याप घोषित न झाल्याने संभाजी ब्रिगेडही वेटिंग मोडवर असल्याचं पहायला मिळतंय.

प्रविण गायकवाडांना उमेदवारी मिळाली तर त्यांना विजयी करण्याचा प्रण संभाजी ब्रिगेडनं केला आहे. त्यासाठी ब्रिगेडच्या राज्यभरातील कार्यकर्त्यांनी तयारी केली आहे.

ब्रिगेडच्या राज्यभरात जिल्हावार बैठका पार पडल्या आहेत. प्रविण गायकवाडांसाठी पुणे गाठायचं आणि मतदान होईपर्यंत पुणे सोडायचं नाही, असा अनेक कार्यकर्त्यांचा निर्धार आहे.

आम्ही सर्व तयारी केलीय. फक्त अधिकृत घोषणेची वाट पाहतोय, असं संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कार्याध्यक्ष अमरजित पाटील यांनी सांगितले आहे. 

दरम्यान, प्रविण गायकवाडांना उमेदवारी द्यायची की काँग्रेसच्या निष्ठावंतांना संधी द्यायची याबाबत काँग्रेस नेतृत्त्व संभ्रमात असल्याचं कळतंय.

महत्वाच्या बातम्या-

-“आमच्या सुनेत्रा वहिनींशी कुणी पंगा घ्यायचा नाही, त्यांच्याकडे 4 खासदार आहेत”

-लालकृष्ण अडवाणी, मनेका गांधी, मनोहर जोशींना भाजपकडून मोठा झटका

-प्रणिती शिंदेंना भाजपकडून अनेकवेळा ऑफर, सुशीलकुमारांचा गौप्यस्फोट

-अरबाज खानच्या गर्लफ्रेंडचा डान्स सोशल मीडियावर व्हायरल

-नितीन गडकरींच्या पाठीवर सुषमा स्वराजांचा हात!