पुणे | भाजपाध्यक्ष अमित शहांच्या मुंबई दौऱ्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूरला जाणे टाळले, असा आरोप संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाड यांनी केला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
पंढरपूरला विठ्ठल पूजेसाठी न जाण्याचं खापर मराठ्यांवर फोडू नका. अमित शहा मुंबईत असल्यामुळे मुख्यमंत्री पूजेला गेले नाहीत, असं गायकवाड म्हणाले.
दरम्यान, वारीत साप सोडण्याच्या मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांवर केलेल्या आरोपाचा त्यांनी समाचार घेतला. मराठा समाजाची बदनामी करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी करण्यात आली.
महत्त्वाच्या बातम्या–
-मराठा मोर्चेकऱ्यांसोबत आता विदर्भवादीही मुख्यमंत्र्यांविरोधात आक्रमक
-मराठा आरक्षणासाठी राणे पिता-पुत्र आक्रमक!
-मराठा मोर्चेकरी काकासाहेब शिंदेच्या मृत्यूनंतर सोशल मीडियात तीव्र संताप
-मराठा आरक्षणासाठी गोदावरीत उडी घेतलेल्या तरुणाचा मृत्यू
-मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात महिला घुसल्या, मराठा आरक्षणासाठी घोषणाबाजी