पुणे | अमोल मिटकरी या संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्याला आमदार करण्याचा शब्द अजित पवार यांनी दिला होता. तो शब्द पाळून त्यांनी एका सामान्य माणसाला आमदार केलं. यानिमित्ताने संभाजी ब्रिगेडमध्ये एक कार्यकर्ता आमदार होऊ शकतो असा संदेश मिळाला, असं संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी म्हटलं आहे.
अमोल कर्तबगार आहेत. विधानपरिषदेत अमोल मिटकरी त्यांच्या कामाचा ठसा उमटवतील, असंही प्रवीण गायकवाड यांनी म्हटलं आहे. प्रवीण गायकवाड यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी ते बोलत होते.
महाराष्ट्रातलं सत्तापालट होण्यात संभाजी ब्रिगेडसह अनेक पुरोगामी संघटनांचा मोठा वाटा आहे. जेव्हा सगळे प्रस्थापित नेते राष्ट्रवादी काँग्रेसला सोडून जात होते. तेव्हा आम्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याचा निर्णय घेतला. भाजपचं सरकार सत्तेतून जावं हाच आमचा अजेंडा होता, असं प्रवीण गायकवाड यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, निवडणुकीच्या काळात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली. मी स्वत: पवार साहेबांसोबत सतत फिरत होतो, असंही प्रवीण गायकवाड यांनी सांगितलंय.
ट्रेंडिंग बातम्या-
‘धारावी पुनर्विकासाला चालना देण्याची हीच वेळ’; जितेंद्र आव्हाड यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
कोरोना हे तिसरं महायुद्ध, चीनी वस्तूंवर बहिष्कार घालून धडा शिकवला पाहिजे- रामदास आठवले
महत्वाच्या बातम्या-
पाहा, आज पुण्यात किती रूग्ण वाढले अन् किती रूग्णांना डिस्चार्ज मिळाला…
लग्नाच्या तिसऱ्या दिवशीच नवविवाहिता कोरोना पॉझिटिव्ह; नवऱ्यासह 32 जण क्वारंटाइन
“सुरतमध्ये मजुरांच्या असंतोषाचा भडका, भाजपने गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना सल्ला द्यावा”
Comments are closed.