बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

प्रविण कुमारची दमदार कामगिरी! अवघ्या 18 व्या वर्षी पटकावलं रौप्यपदक

टोकियो | सध्या जपानची राजधानी टोकियोमध्ये पॅराऑलिम्पिकच्या स्पर्धा खेळवल्या जात आहेत. भारतीय खेळाडूंनी या स्पर्धेत आतापर्यंत दमदार कामगिरी केल्याचं पहायला मिळाली. आतापर्यंत भारतीय खेळाडूंनी 10 पदकांची कमाई केली होती. त्यातच आता भारताच्या खात्यात 11 व्या पदकाची भर पडली आहे.

भारताच्या प्रविण कुमारने रौप्यपदकांची कमाई केली आहे. पुरूषांच्या उंच उडी स्पर्धेत प्रविण कुमारने रौप्यपदक पटकवलं आहे. त्याने या स्पर्धेत 2.07 मीटर उंच उडी मारली आणि त्याने आशियाई रेकाॅर्ड आपल्या नावावर केला आहे.

अवघ्या 18 व्या वयात त्याने ही कामगिरी केली आहे. कमी वयात अपघात झाला मात्र, त्यानंतर जगण्याची लढाई होती आणि आयुष्यात उभं राहण्यासाठी त्याने धडपड केली. त्यानंतर या सगळ्या संघर्षातून त्याने रौप्यपदकाला गवसणी घातली आहे.

दरम्यान, आतापर्यंत भारताने एकूण 11 पदकं मिळवली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रविण कुमारचं कौतूक केलं आहे. मोदींनी पदक जिंकल्याबद्दल अभिमान वाटत असल्याचं म्हटलं आहे. हे पदक तुझ्या मेहनतीचं फळ आहे, असंही मोदी म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या-

सिद्धार्थ शुक्लावर आज मुंबईत होणार अंत्यसंस्कार; चाहत्यांवर दु:खाचा डोंगर

सीबीआयचा लीक झालेला ‘तो’ अहवाल खराच; राष्ट्रवादी काॅंग्रेसचा दावा

‘सिद्धार्थचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानं होऊच शकत नाही’; ‘या’ व्यक्तीच्या दाव्यानं प्रकरणाला नवं वळण

मुख्यमंत्र्यांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक; ‘या’ मुद्द्यावर होणार गंभीर चर्चा

शरद पवार शब्द पाळणार???; राजू शेट्टींनी करून दिली ‘त्या’ बैठकीची आठवण

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More