पुणे | सुप्रसिद्ध संगीतकार नरेंद्र भिडे यांचे आज पहाटेच्या सुमारास हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे. नरेंद्र भिडेंच्या निधनानंतर प्रविण तरडे यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.
प्रविण तरडे फेम अरारारारा… खतरनाकssss पुन्हा होणे नाही, या संगीताची चाल ज्यांना तीन वर्षांपूर्वी सूचली तो माझा हक्काचा संगीतकार गेला, असं म्हणत अभिनेता प्रविण तरडे यांनी आपले दु:ख व्यक्त केलं आहे.
प्रविण तरडे यांनी आपल्या फेसबुक आकाऊंटवरुन प्रविण तरडे आणि संगीतकार नरेंद्र भिडे यांनी ज्यादिवशी ‘अरारारारा… खतरनाकssss’ हे संगीत कंपोज केलं, त्या दिवसाचा व्हिडीओ शेअर करत त्यांना आदरांजली वाहिली आहे. तसेच ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटात नरेंद्र भिडेंनी कलाकार म्हणूनही भूमिका केली होती.
दरम्यान, सकाळी 11 वाजता वैकुंठ स्मशानभूमीत नरेंद्र भिडे यांच्यार अंत्यसंस्कार झाला आहे. नरेंद्र भिडे हे 47 वर्षांचे होते. त्यांच्या पाश्चात आई, वडील, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.
थोडक्यात बातम्या-
‘…तर उद्या विधानसभा बरखास्त करून राज्यात निवडणुका घ्या’; भाजपचं राष्ट्रवादीला आव्हान
…म्हणून रानगव्याचा मृत्यू झाला; वनविभागातील अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण
….म्हणून अमेरिकेत लोकांना कोरोना झाला हे बरं झालं- डोनाल्ड ट्रम्प
‘आज शिर्डीतील ड्रेसकोड सक्तीचा बोर्ड काढणारच’ तृप्ती देसाईंचा निर्धार
आधीच स्क्रिनवर 15 सेकंदाचा रिप्ले दाखवणं महागात पडलं; ‘त्या’ निर्णयावर कोहली नाराज