Pravin Tarde | मराठमोळा दिग्दर्शक, लेखक आणि अभिनेता प्रवीण तरडे (Pravin Tarde) हा नेहमी चर्चेत असलेला पाहायला मिळतो. त्याने मराठी चित्रपटसृष्टीला अनेक सिनेमे दिले आहेत. नुकताच त्याता मुळशी पॅटर्न नावाचा सिनेमा येऊन गेला. त्याची जोरदार चर्चा होताना दिसते. दिग्दर्शक प्रवीण तरडेनं (Pravin Tarde) अनेक मराठी सिनेमात काम केलं आहे. त्याच्या मुळशी पॅटर्नचा बॉलिवूडमध्ये रिमेक देखील करण्यात आला होता. मात्र आता प्रवीण तरडे (Praveen Tarde) दक्षिणात्य सिनेमात झळकणार आहे. त्याने आपला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याची जोरदार चर्चा आहे.
दक्षिणात्य सिनेमात प्रवीण तरडे झळकणार
‘अहो विक्रमार्का’ या दक्षिणात्य सिनेमातून प्रवीण तरडे (Pravin Tarde) झळकणार आहे. प्रवीण तरडे दक्षिणात्य चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत आहे. त्याने सोशल मीडियावरील सिनेमातील लूकचा फोटो शेअर केला. त्या फोटोला एक संदेशही लिहिला आहे.
मराठी आणि हिंदी सिनेमानंतर आता प्रवीण तरडे दक्षिणात्य सिनेमांमध्ये काम करताना दिसणार आहे. दरम्यान प्रवीण तरडे दिग्दर्शीत धर्मवीर सिनेमाची दक्षिणात्य दिग्दर्शक एस. एस. राजामौलीने प्रशंसा केली होती. आता प्रवीण तरडे दक्षिणात्य सिनेमात काम करत आहेत. दरम्यान प्रवीण तरडे हे असुर नावाची भूमिका साकारणार आहेत.
प्रवीण तरडेची पोस्ट चर्चेत
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत “मुख्य खलनायक “ म्हणून माझा प्रवेश .. अहो विक्रमार्का मधे “ असुरा “ बनून येतोय तुमच्या भेटीला…मराठी बरोबर भारतातल्या सहा भाषांमधे अख्ख्या भारतभर मार्केट आता आपलं आहे, असं प्रविण तरडे म्हणाला.
View this post on Instagram
‘अहो विक्रमार्का’ या चित्रपटामध्ये दक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता देव गिल प्रमुख भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात प्रवीण तरडेंसह मराठी अभिनेत्री तेजस्वीनी पंडित, चित्रा शुक्ला आणि संयाजी शिंदे हे कलाकार या चित्रपटामध्ये काम करणारे आहेत.
प्रवीण तरडे नाटाकाच्या माध्यमातून कलाविश्वामध्ये आले. त्यांनी अनेक नाटकं, एकांकिका लिहिल्या आहेत आणि दिग्दर्शित केल्या आहेत. तसेच हिंदी आणि मराठी मालिकांचे देखील त्यांनी लेखन केलं होतं. तसेच त्यांनी मराठी आणि हिंदी सिनेमात देखील काम करून आपल्या अभिनयाचा डंका वाजवला आहे. आता ते दक्षिणात्य चित्रपटात महत्त्वाची खलनायकाची भूमिका साकारणार आहेत.
News Title – Pravin Tarde Play Role In South Indian Cinema
महत्त्वाच्या बातम्या
“ऋषी कपूरमुळे माझं आयुष्य बरबाद..”; ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने केले होते गंभीर आरोप
‘सगळ्या गोष्टींमुळे मी प्रचंड…’; पंकजा मुंडेंचं मोठं वक्तव्य
नागपूर ते थेट मालदीव,डॉली चहावालाने समुद्र किनारी उघडली चहाची टपरी; Video व्हायरल
रोहित पवार यांच्या एका ट्विटने पोलीस प्रशासन हललं, हजारो विद्यार्थ्यांना मिळाला दिलासा
प्रसिद्ध रिलस्टार सनी जाधववर बलात्काराचा आरोप; सोशल मीडियावर खळबळ