बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

माझा प्रणीतदादा गेला… मित्राच्या मृत्यूनं प्रविण विठ्ठल तरडे हळहळले!

मुंबई | मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध गीतकार, लेखक आणि दिग्दर्शक प्रणीत कुलकर्णी यांचं निधन झालं आहे. प्रणीत कुलकर्णींच्या जाण्याने मराठी सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. कुलकर्णींच्या निधनामुळे मराठी चित्रपट सृष्टीतले कलाकार आपला शोक व्यक्त करत आहेत. अशातच प्रसिद्ध अभिनेते आणि लेखक प्रविण तरडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

माझा प्रणित दादा गेला. सरस्वती प्रसन्न असलेला शब्दप्रभु हरपला. गीतकार, लेखक, दिग्दर्शक प्रणीत कुलकर्णी बद्दल लिहायला लागलो तर दिवस पुरायचा नाही, असं प्रविण तरडे यांनी म्हटलं आहे. नंतर सविस्तर लिहिणार असल्याचंही तरडेंनी म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी फेसबुक पोस्ट केली आहे.

‘देऊळबंद’ला माझ्यासोबत लेखन दिग्दर्शन आणि देऊळबंद, मुळशी पॅटर्न, सरसेनापती हंबीररावचा गीतकार, आ रा रा खतरनाक, उन उन वठातून, आभाळा आभाळा, गुरूचरीत्राचे कर पारायण आणि हंबीर तु खंबीर तु अशी एका पेक्षा एक गाणी लिहून प्रणीतदादा गेला कायमचा, असं प्रविण तरडेंनी म्हटलं आहे.

दरम्यान, प्रणीत यांनी ज्या गाण्यांचं लेखन केलं आहे ती गाणी प्रत्येकाच्या तोंडवळणी पडली आहेत. काहींना माहितीही नाही की ती गाणी प्रणीत कुलकर्णी यांनी लिहिली आहेत. मात्र तरीही प्रेक्षकांना तोंडपाठ आहेत. महाराष्ट्रभर गाजलेला देऊळबंद चित्रपट यामध्ये त्यांनी प्रविण तरडेंसोबत दिग्दर्शन केलं होतं.

थोडक्यात बातम्या- 

देऊळबंद चित्रपटाचे दिग्दर्शक प्रणीत कुलकर्णी यांचं निधन

भारत बायोटेकचा प्रकल्प पुण्याला पळवल्याचा भाजपचा आरोप, अजित पवार म्हणाले…

“…तर पुढच्या दोन आठवड्यात कोरोनाची दुसरी लाट संपुष्टात येईल”

‘पनवतीयों का बाप है ये बॉस’; चक्रीवादळावरून नितेश राणेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

“चक्रीवादळ गुजरातला पळवण्याचा मोदी-शहांचा डाव, राऊत मुंबईतच अडवणार”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More