साडेसाती सोडवण्यासाठी प्रवीण तोगडिया शनीचरणी

अहमदनगर | गेल्या काही वर्षांपासून सातत्याने वादात सापडणाऱ्या विश्व हिंदू परिषदेच्या प्रवीण तोगडिया यांनी शनी मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. तसेच शनी देवाला तेलाचा अभिषेक घातला.

प्रवीण तोगडिया यांनी मोदी आणि भाजपवर सातत्याने टीका केली होती. त्यानंतर ते काही दिवस गायब होते. आपलं अपहरण केल्याचा दावा त्यांनी केला होता. त्यांच्या या दाव्यावर शंका व्यक्त करणारी सीसीटीव्ही दृश्यं समोर आली आहेत.

दरम्यान, मधल्या काळात त्यांनी झालं गेलं गंगेला मिळालं म्हणत मोदींशी जुळवून घेण्याचे संकते दिले होते. मात्र आता शनी चरणी दाखल झाल्याने तोगडिया यांना साडेसातीत सापडल्याच्या भावनेनं ग्रासल्याचं बोललं जातंय.