झालं गेलं गंगेला मिळालं; तोगडियांना नकोय मोदींशी पंगा

नवी दिल्ली | विश्व हिंदू परिषदेचे कार्याध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतचे संबंध सुधारण्यासाठी पुढाकार घेतला आहे. झालं गेलं गंगेला मिळालं, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलीय. 

मोदी आणि तोगडिया यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून धूसफुस सुरु आहे. तोगडिया यांना विहिंपचं कार्याध्यक्ष होण्यापासून रोखण्यासाठी मोदींनी रणनीती आखली होती, मात्र ती सफल झाली नाही, असं मानलं जातं. 

दरम्यान, नुकताच आपलं अपहरण झाल्याचा कांगावा तोगडिया यांनी केला होता. नंतर तो ड्रामा असल्याचं समोर आलं होतं. मात्र या प्रकारामुळे मोदी आणि तोगडिया यांच्यातील संबंध आणखी ताणले गेले. आता हे संबंध सुधारण्यासाठी तोगडियांनीच पुढाकार घेतलाय.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या