बुलंदशहरमध्ये दंगे भडकवण्यासाठी गोहत्या करण्यात आली- तोगडिया


थोड्याच अंतरावर मुस्लीम समुदायाचा कार्यक्रम होणार होता. हे माहित असूनही प्रशासनाच्या मदतीने गोहत्या घडवून आणण्यात आली- प्रवीण तोगडिया

लखनऊ | बुलंदशहरमध्ये झालेला दंगा आणि गोहत्या या पूर्वनियोजीत होत्या, असं म्हणत आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी भाजपवर निशाना साधला आहे. ते विजय नगरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

थोड्याच अंतरावर मुस्लीम समुदायाचा कार्यक्रम होणार होता. हे माहित असूनही प्रशासनाच्या मदतीने गोहत्या घडवून आणण्यात आली, असा आरोप त्यांनी केला आहे. 

भाजप सरकारच्या काळात हिंदूंचं पलायन होत आहे. लोकांमध्ये दंगे घडवून ध्रुवीकरण करण्यात येतं आहे, असंही ते म्हणाले.

दरम्यान, भाजप सरकार हिंदू विरोधी आहे. राम मंदिर बांधण्याची त्यांची इच्छा असती, तर त्यांनी ते कायदा आणून केव्हाच बनवलं असतं, असंही ते म्हणाले.

 

महत्वाच्या बातम्या-

-कोर्टाच्या आदेशापुढे संभाजी भिडे नमले; अखेर नाशिक न्यायालयात हजेरी

-होय, भाजपने गरज पडेल तसा माझा वापर करुन घेतला- एकनाथ खडसे

-जगाला हेवा वाटावा असा विक्रम पाकिस्तानी गोलंदाजाच्या नावावर!

-‘वसुंधरा राजे खूप जाड झाल्या आहेत, त्यांना आराम द्या’ वक्तव्यावर शरद यादवांच स्पष्टीकरण

-मलाही लग्न करुन सुखी संसार थाटायचा होता, पण… – कतरिना कैफ