Prdhanmantri Jeevan Jyoti Bima Yojana l या योजनेत अवघे 330 रुपये गुंतवा अन् निश्चिन्त राहा

Prdhanmantri Jeevan Jyoti Bima Yojana l भारत सरकारकडून नागरिकांना लाभ मिळवून देण्यासाठी अनेक योजना राबवल्या जातात.अशाच प्रकारची एक योजना भारत सरकारने सुरू केली आहे, तिचे नाव आहे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना असे आहे. ही योजना भारतीय आयुर्विमा महामंडळामार्फत सुरू (PMJJBY) करण्यात आलेली योजना आहे. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेंतर्गत, एखाद्या अर्जदाराचा वयाच्या 55 ​​वर्षापूर्वी कोणत्याही कारणाने मृत्यू झाला तर सरकार त्याच्या नॉमिनीला दोन लाखांचा जीवन विमा प्रदान करतात.

या योजनेंतर्गत पॉलिसी योजना घेण्यासाठी नागरिकांचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 55 वर्षे असावे. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना हा (Prdhanmantri Jeevan Jyoti Bima Yojana) भारत सरकारचा एक अतिशय चांगला उपक्रम असून या योजनेमुळे गरीब आणि वंचित वर्गातील लोकांनायाचा फायदा मिळू शकतो. देशातील लाभार्थी या प्रधानमंत्री जीव ज्योती (PMJJBY) विमा योजनेचा लाभ घेऊ शकतात. जर लोकांना ज्योती विमा योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांना या योजनेअंतर्गत अर्ज करावा लागेल.

Prdhanmantri Jeevan Jyoti Bima Yojana l पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेचा प्रीमियम रक्कम किती आहे? :

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा या योजनेअंतर्गत पॉलिसीधारकाला दरवर्षी 330 रुपये प्रीमियम जमा करावा लागेल. जे दरवर्षी मे महिन्यात ग्राहकांच्या बचत खात्यातून स्वयं-डेबिट केले जाते. या योजनेअंतर्गत EWS आणि BPL सह जवळजवळ सर्व उत्पन्न गटातील सर्व नागरिकांसाठी प्रीमियमचा परवडणारा दर उपलब्ध आहे.

एलआयसी/विमा कंपनीला विमा प्रीमियम – रु 289/-
बीसी/मायक्रो/कॉर्पोरेट/एजंटसाठी खर्चाची प्रतिपूर्ती – रु.30/-
सहभागी बँकेच्या प्रशासकीय शुल्काची परतफेड – रु 11/-
एकूण प्रीमियम – फक्त रुपये 330/-

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचे उद्दिष्ट :

देशातील लोकांसाठी ही एक अतिशय चांगली योजना आहे. या पीएम जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत, 18 ते 50 वर्षे वयाच्या पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर, ही योजनेंतर्गत, पॉलिसीधारकाच्या कुटुंबाला सरकारने (Prdhanmantri Jeevan Jyoti Bima Yojana)  दिलेली 2 लाख रुपयांची रक्कम दिली जाईल, जेणेकरून ते त्यांचे जीवन चांगले जगू शकतील.

Prdhanmantri Jeevan Jyoti Bima Yojana l जीवन ज्योती वीमा योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे :

आधार कार्ड
ओळखपत्र
मोबाईल नंबर
पासपोर्ट साईज फोटो
बँकेचे पासबुक

महत्त्वाच्या बातम्या –

PAK vs NZ | 16 सिक्स अन् 5 चौकार! पाकिस्तानची लाज गेली; न्यूझीलंडच्या खेळाडूचं झंझावाती शतक

Raveena Tandon l कुणाचं कुणासोबत अफेअर… अभिनेत्री रविना टंडननं केला आतापर्यंतचा सर्वात मोठा गौप्यस्फोट

प्रसिद्ध Actress नवऱ्यापासून घटस्फोट घेण्याच्या मार्गावर, या एका गोष्टीमुळे साऱ्या बॅालिवूडमध्ये चर्चा!

Madhuri Dixit तेव्हा सेटवर रडली होता, तो सीन करायला… कलाकाराचा खळबळजनक दावा

Jawa 350 Launched in India l रॉयल एनफील्ड क्लासिक 350 ला टक्करं देण्यासाठी Jawa 350 बाईक लाँच