बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ भाजप नेत्याला उच्च न्यायालयाचा दणका, अटकेची शक्यता

मुंबई | भाजपचे नेते जयकुमार गोरे यांचा जामीन उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. मृत व्यक्तीची बनावट कागदपत्रे बनवून फसवल्याच्या आरोपाखाली त्यांच्यावर ऑट्रासिटीचा(atracity) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जयकुमार गोरे यांनी अटकपूर्व जामीनासाठी वडूज सत्र न्यालयात अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने तो जामीन फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात अर्ज केला. पण आता तो ही जामीन न्यायालयाने फेटाळला. यामुळे आता जयकुमार गोरे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

मायणी येथाल छत्रपती शिवाजी महाराज एज्युकेशन येथील गट नं 769 येथील मयत असलेल्या अल्पभूधारक व्यक्तीला जिवंत दाखवत जमीनीची बनावट कागदपत्र तयारी केली. त्यामुळे अल्पभूधारक कुटुंबाची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

दरम्यान, जयकुमार गोरे यांचा जामीन उच्च न्यालयाने फेटाळल्यानंतर ते सर्वाेच्च न्यायालयात अर्ज करणार आहेत. यासाठी त्यांना दोन आठवड्याची मुदत देण्यात आलीये. यावर सर्वाेच्च न्यायालय काय निर्णय देईल पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या

विधानपरिषद निवडणुकीच्या तोंडावर अनिल परबांच्या अडचणीत वाढ!

‘…मग करायचं काय एक्सचेंज’; मुख्यमंत्र्यांचा राज्यपाल भगतसिंग कोश्यारींना टोला

“भाजपच्या अध्यात्मिक आघाडीने धार्मिक कार्यक्रम राजकीय करून टाकला”

‘हा महाराष्ट्राचा अपमान,अजित पवारांना भाषणाची संधी दिली नाही हा अन्याय’; सुप्रिया सुळे संतापल्या

‘मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या’; वाचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More