बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्याच्या या भागात अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता; हवामान खात्याचा इशारा

मुंबई | भारतीय हवामान खात्याने पश्चिम किनारपट्टीवर चक्रीवादळाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये 3 जून आणि 4 जून रोजी अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. भारतीय हवामान खात्याने या भागासाठी रेड आणि ऑरेंज अलर्ट दिला आहे

रेड अलर्ट भागामध्ये अतिमुसळधार तर ऑरेंज अलर्टमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो. दुसरीकडे 1 जूनलाही काही भागात वाऱ्यासह थोड्या पावसाचा अंदाजही भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.

दक्षिणपूर्व आणि लगतच्या मध्यपूर्व अरबी समुद्र आणि लक्षद्वीप भागात कमी दाबाचं क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे पुढच्या 12 तासात पूर्वपश्चिम आणि लगतच्या नैऋत्य अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होईल. त्यानंतरच्या 24 तासात पूर्वोत्तर अरबी समुद्रावरील चक्री वादळामध्ये रुपांतर होण्याची शक्यता आहे.

1 जूनला दक्षिण कोकण आणि गोव्यात मुसळधार, अति किंवा अत्यंत मुसळधार पाऊस पडू शकतो. 2 आणि 3 जूनला दक्षिण कोकण आणि गोव्यात बहुतेक ठिकाणी हलका आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस असेल तर थोड्या ठिकाणी अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

मला सरकारची चिंता नाही… सरकार कुणी पाडू शकत नाही- उद्धव ठाकरे

“जवळपास 28 हजार रुग्ण बरे झालेत, महाराष्ट्राला बदनाम करण्याचं कारस्थान पाहून दु:ख होतं”

महत्वाच्या बातम्या-

अक्षय बोऱ्हाडे-शेरकर वादाच्या कलाटणीनंतर मिटकरींची गरमागरम फेसबुक पोस्ट!

बॉलीवूडचा दिग्गज गायक कोरोनाने हिरावला, संपूर्ण बॉलीवूड शोकसागरात

परप्रांतीय कामगारांना परत आणण्याची जबाबदारी उद्योजकांनी घ्यावी- नितीन गडकरी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More