बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

प्री-माॅन्सून सिझनला सुरवात; ‘या’ राज्यात पावसाची शक्यता

नवी दिल्ली | मागील काही दिवसांपासून देशाच्या विविध भागात हवामान बदल होताना दिसत आहे. तर काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस देखील पडला आहे. तर येत्या 24 ते 48 तासात देशाच्या काही भागात पाऊस पडणार आहे. हवामान विभागाने देशाच्या अनेक राज्यात आणि प्रदेशात पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, झारखंड आणि ओडिसा या राज्यात हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. स्कायमेटच्या अंदाजानुसार, पुढील 24 तासात उत्तर भारतातील पर्वतीय भागात पाऊस होण्याची शक्यता आहे. तर पर्वतीय भागात 17 मार्च पर्यंत पाऊस कायम राहण्याची शक्यता आहे. तर 16 आणि 17 मार्चला पंजाब हरियाणा, दिल्लीसह उत्तर प्रदेशात पाऊस पडू शकतो.

उत्तरी पर्वतीय भागातील हवामानाचा होणाऱ्या बदलाचा परिणाम मैदानी भागात होताना दिसत आहे. मध्यप्रदेशातील काही भागात ग्वाल्हेर, चंबळ आणि भोपाळमध्ये पाऊस पडणार आहे. जर काही समुद्री हालचाली झाल्या तर महाराष्ट्राच्या काही भागात देखील हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

दरम्यान, मार्चच्या पहिल्या पंधरावड्यात देशात प्री-माॅन्सून पाऊस पडत असतो. मार्च ते एप्रिल दरम्यान, हा  प्री-माॅन्सून सिझन असतो. यामध्ये ढगांचा गडगडात, वीज चमकणे, गारा पडणे अशा हालचाली होत असतात. तर पुर्वोत्तर राज्यात पावसाचे स्वरूप अधिक तीव्र असते.

थोडक्यात बातम्या – 

मोठी बातमी! सचिन वाझे यांचं पोलीस दलातून निलंबन

रेल्वेच्या पुलावर मुलं उभी होती, तेवढ्यात अचानक मालगाडी आली अन्…. पाहा व्हिडिओ!

गंगुबाईच्या लुकनंतर आलियाचा ‘हा’ लुक होतोय प्रचंड व्हायरल; पाहा आलियाचा नवीन लुक

महागाईचा कहर! आता खाद्यतेलाच्या किंमती तब्बल ‘इतक्या’ टक्यांनी वाढल्या

भाजपच्या या आमदाराने योगी आदित्यनाथांसोबत केली छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना; म्हणाले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More