बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मविआ सरकारच राज्याला लागलेला कोरोना म्हटलं तर राऊतांना आवडेल का?”

मुंबई | कोरोना महामारीत मुंबईत चांगल्या कामाचं जागतिक आरोग्य संघटनेसह पंतप्रधान मोदींनीही कौतुक केलंय. मात्र, विरोधक त्यावर टीका करत आहेत. शिवसैनिकांनी विरोधकांच्या या टीकेकडे दुर्लक्ष करुन कामाकडे लक्ष द्यावं. कारण विरोधक ब्लॅक फंगस आहेत, अशी टीका शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केली. याला विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

जर आम्ही म्हटलं की मविआ सरकारच महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे तर संजय राऊत यांना आवडेल का?, असा सवाल करत प्रविण दरेकर यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.

विरोधी पक्षाला ब्लॅक फंगस म्हणण्याचं वक्तव्य हे मला वाटतं की कशाचंही भान न ठेवता बेभान होऊन केलेलं वक्तव्य आहे. यावरून भाजप किंबहूना विरोधकांविरुद्ध त्यांच्यात किती तिरस्कार भरलेला आहे हे या वक्तव्यावरून दिसत आहे, असं प्रविण दरेकर म्हणाले.

अशा प्रकारची वक्तव्य करून केंद्र-राज्य वाद निर्माण करायचा आणि आपण मीडियाच्या माध्यमातून खळबळजनक वक्तव्य करत चर्चेत रहायचं याव्यतिरिक्त या वक्तव्याला किंमत नाहीये. त्यांचं हे वक्तव्य निषेधार्य आहे. ज्यावेळी अशा प्रकारचं वक्तव्य आमचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांच्या बाबत केलं होतं तेव्हा भाजपने सुद्धा त्यांना समज देत वक्तव्य चुकीचं असल्याचं म्हटलं होतं. माझं मुख्यमंत्र्यांना सांगणं आहे की तुम्ही संजय राऊत यांना समज देणार आहात का?, असा सवाल प्रविण दरेकर यांनी केला आहे.

थोडक्यात बातम्या- 

“….नाहीतर गंगेत तरंगणाऱ्या पापांचे मालक म्हणून समोर या”

सकारात्मक बातमी | 101 वर्षांच्या आजीबाईंची कोरोनावर मात

“आम्ही राष्ट्रवाद गंगेत मुडद्याच्या रुपात तरंगताना पाहिलाय”

प्रसिद्ध पिझ्झा ब्रँड ‘डोमिनोज’ कंपनीचा डेटा लिक; ग्राहकांची ‘ही ‘ माहिती डार्क वेबवर उपलब्ध

‘मोदी लाईव्ह येऊन रडणार’; ‘या’ खासदाराची भविष्यवाणी ठरली खरी, पाहा व्हिडीओ 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More