बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भारताला पहिलं गोल्ड मेडल मिळवून देणाऱ्या हॉकी संघातील अनमोल तारा निखळला!

नवी दिल्ली | हॉकी संघातील दिग्गज खेळाडू केशव दत्त यांचं आज सकाळी निधन झालं आहे. केशव दत्त यांनी पश्चिम बंगाल येथील त्यांच्या राहत्या घरी वयाच्या 95व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. दत्त यांच्या निधनाने क्रीडा विश्वाला मोठा धक्का बसला आहे. अनेक दिग्गजांनी केशव दत्त यांच्या निधनाची वार्ता देत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देखील केशव दत्त यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे. ममता बॅनर्जी ट्वीट करत म्हणाल्या की, हॉकी विश्वाने एका महान खेळाडूला गमावलं आहे. केशव दत्त यांच्या निधनाने मी खूप दु:खी आहे. ते 1948 आणि 1952 मध्ये ऑलिम्पिक सुवर्ण पदक जिंकवणाऱ्या संघात होते. केशव दत्त भारत आणि पश्चिम बंगालचे चॅम्पियन होते. त्यांचे कुटुंब आणि मित्र यांच्याबद्दल सहानुभूती.

तसेच हॉकी इंडियाच्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवरुन देखील केशव दत्त यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. 1948 आणि 1952च्या ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या संघातील दिग्गज खेळाडू केशव दत्त यांच्या निधनाने हॉकी इंडियाला दु: ख झाले असून हॉकी महासंघाच्यावतीने त्यांच्या कुटूंबियांबद्दल शोक व्यक्त करतो, असं ट्वीट हॉकी इंडियाने केलं आहे.

दरम्यान, 1948 आणि 1952 साली ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या हॉकी संघातील केशव दत्त एक दिग्गज खेळाडू होते. केशव दत्त हे 1951-1953 आणि नंतर 1957-1958 मध्ये मोहन बागान या क्लबकडून देखील खेळले होते. 2019 मध्ये दत्त यांना मोहन बागान रत्न पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

केंद्रीय आरोग्यमंत्री डाॅ. हर्षवर्धन यांनीही दिला मंत्रीपदाचा राजीनामा

“शेतकरी उध्वस्त होत आहेत, जोपर्यंत कायदा मागे घेतला जात नाही तोपर्यंत घरी जाणार नाही”

आज तब्बल एवढे मंत्री घेणार मंत्रिपदाची शपथ; केंद्रीय मंत्र्यांची संख्या जाणार 81 वर 

“उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाच्या सुविधांचा उपभोग घ्यायचा आहे, पण जबाबदारीपासून पळ काढायचा आहे”

खुशखबर! पुण्यात ‘इतक्या’ रुपयांमध्ये करा एसी बसने प्रवास

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More