बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘कोरोनाची तिसरी लाट अटळ’; केंद्र सरकारच्या मुख्य वैज्ञानिक सल्लागारांचं भाकीत

नवी दिल्ली | मागील वर्षापासून महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाचं संकट अधिक गंभीर प्रमाणात समोर येत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अधिक धोकादायक मानली जात आहे. जगाच्या वेगवेगळ्या भागातून कोरोनाचे नवे विषाणू समोर येत आहेत. त्यामुळे कोरोनाच्या एकामागून एक लाटा येताना दिसत आहे. यातच आता केंद्र सरकारच्या मुख्य वैज्ञानिक सल्लागार के. विजयराघवन यांनी एक भाकीत केलं आहे.

कोरोनाची तिसरी लाट अटळ आहे. याचं कारण विषाणू अजून बऱ्याच प्रमाणात फिरत आहे. पण ही लाट केव्हा येईल, तिचे स्वरूप काय राहील हे सांगणे कठीण आहे. सध्याच्या कोरोना विषाणू प्रकारावर आताच्या लसी परिणामकारक आहेत. पण अजूनही कोरोनाचे नवे विषाणू येण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं के. विजयराघवन यांनी म्हटलं आहे.

प्रतिकारशक्तीला चकवा देणारे विषाणू धोकादायक ठरू शकतात. कोरोना संसर्गाचे रूप हे त्यावरून ठरणार आहे. जगभरात नवीन विषाणू प्रकार येतील तसे भारतातही ते येतील. त्यामुळे संक्रमणही वाढेल. असे असले तरी या केव्हातरी संसर्गाचा आलेख सपाट होणारच आहे, फक्त त्यासाठी प्रतिबंधात्मक उपायात ढिलाई करता कामा नये, असंही त्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, पश्चिम बंगाल, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, राजस्थान, बिहार या राज्यांमध्ये दैनंदिन रुग्ण वाढत आहेत. त्यामुळेच आता महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, केरळसह बारा राज्यात 1 लाखाहून अधिक कोविड रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी लोकांनी कोरोना निर्बंधाचं पालन करणं गरजेचं आहे.

थोडक्यात बातम्या-

कोरोना लसीचा दुसरा डोस घ्यायला उशीर झाल्यास लस परिणाम करेल का?; वैद्यकीय तज्ज्ञ म्हणतात…

रिषभ पंतची ऐतिहासिक कामगिरी; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय खेळाडू

“मराठा समाजाला ओबीसी म्हणून आरक्षण देणे हा एकच पर्याय”

आसाराम बापू आयसीयूमध्ये दाखल; काही दिवसांपुर्वी झाला होता कोरोना

‘मराठा आरक्षण हा पेटवापेटवीचा विषय नाही’; सामनातून विरोधकांवर टीकेचे बाण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More