बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धनंजय मुंडेंच्या ‘त्या’ वक्तव्याकडे विनोद म्हणून पाहते- प्रीतम मुंडे

बीड | मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी हुतात्मा स्मारकाला मानवंदना देत पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहिली. त्यावेळी बोलताना धनंजय मुंडेंनी भाजपवर टीका केली होती. धनंजय मुंडेंच्या त्या टीकेला भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

फडणवीस सरकारच्या काळात मराठवाड्यासाठी काही आश्वासने देण्यात आली. मात्र ही आश्वासने अपुर्ण राहिल्याने ती आश्वासने महाविकास आघाडी सरकार पुर्ण करेल असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं होतं. यावर, मी धनंजय मुंडे यांनी केलेल्या वक्तव्याकडे केवळ विनोद म्हणुन पाहते. त्यांनी ते वक्तव्य पत्रकारांना हसवण्यासाठी केलं असेल, असं म्हणत प्रीतम मुंडे यांनी धनंजय मुंडेंना टोला लगावला आहे.

आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्ता बीडमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलताना धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा केली. संपुर्ण बीड जिल्ह्यात जे नुकसान झाल आहे त्याची नुकसान भरपाई देण्याची मागणी पीक विमा कंपन्यांना मागणी करणार असल्याचं धनंजय मुंडे म्हणाले.

दरम्यान, प्रीतम मुंडे यांच्या वक्तव्याला धनंजय मुंडे काय प्रत्युत्तर देतात हे पाहण महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या- 

“नवज्योत सिंग सिद्धू म्हणजे पॉलिटिक्समधील राखी सावंत”

मी उद्धव ठाकरेंच्या संपर्कात, मी माझी भूमिका मांडली आता… – रामदास आठवले

पुण्यातील मानाच्या पाच गणपतींचं विसर्जन होणार ‘या’ वेळेत, मंडळांनी दिली माहिती!

‘पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षात आणण्याची योग्य वेळ नाही’; अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी सांगितलं कारण

पोरांनो तयारीला लागा! पोलीस भरतीची तारीख जाहीर, वाचा संपूर्ण माहिती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More