बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…तर आरक्षणाचं सर्व क्रेडिट केंद्र सरकारला देणार का?- प्रीतम मुंडे

नवी दिल्ली | केंद्र सरकारने पुन्हा एकदा घटनादुरूस्तीमध्ये बदल करत आरक्षणाचा अधिकार राज्याकडे सोपवला आहे. यावर राज्यभर चर्चा आहेच तर आज लोकसभेतही 102 च्या घटना दुरूस्तीवर चर्चा झाली. यासंदर्भात बोलताना खासदार प्रीतम मुंडे यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

केंद्रावर प्रत्येक गोष्ट ढकलायची हा एककलमी कार्यक्रम आघाडी सरकारने घेतला आहे. 50 टक्यांमध्येच आरक्षणाची मागणी करणाऱ्यांना कसं बसवायचं?, आणि कोणत्या जातीला किती आंदोलन द्यायचं हे आम्हाला केंद्राने सांगावं, असं कोणीतरी सदस्य म्हणाले. जर येत्या काळात हे केंद्राने सांगितलं आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न मिटला तर आरक्षणाचं सर्व क्रेडिट केंद्र सरकारला देणार का?, असा सवाल प्रीतम मुंडे यांनी केला आहे.

केंद्र सरकार निश्चितच तुमच्यासाठी वर्गीकरण करून देईल, असंही प्रीतम मुंडे म्हणाल्या. उच्च न्यायालयात चांगली बाजू मांडली तर आमचं श्रेय सुप्रीम कोर्टात फेल गेले तर केंद्राचं अपयश अशी तुमची दुजाभावाची भावना असेल तर जनता तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नसल्याचं प्रीतम मुंडे यांनी म्हटलं आहे. केंद्राने आरक्षणाबाबतचे अधिकार राज्याला दिले होते त्यावर मराठा समितीचे उपप्रमुख अशोक चव्हाण यांनी केंद्रावर टीका केली होती.

दरम्यान, केंद्राकडून आरक्षणाचा अधिकार राज्यांना मिळाला म्हणजे आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला गैरसमज असल्याचं अशोक चव्हाणांनी म्हटलं होतं.

थोडक्यात बातम्या-

“आता कळलं ठाकरे सरकारमधील ‘हे’ मंंत्री येड्या सारखं का बडबडतात”

स्टेडियममध्ये सामना बघताना तरूणी पकडायला गेली चेंडू तितक्यात…; व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल!

राज्य सरकारला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका; अकरावीची प्रवेशपूर्व परीक्षा न्यायालयाकडून रद्द

खळबळजनक! मंत्रालयात सापडला दारूच्या बाटल्यांचा खच

आयुर्वेदाचार्य योगगुरू बालाजी तांबे यांचं निधन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More