बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नाद करा पण प्रीति झिंटाचा कुठं???; शाहरुख खानलाच विकत घेतलं!

चेन्नई | आयपीएल 2021 साठी पार पडलेल्या लिलावात ईरेला पेटल्यावर काय होतं, याचा प्रत्यय आला. बोली लावताना किंग्ज इलेव्हन पंजाबची मालकीण प्रीति झिंटा नेहमी आपल्या आवडत्या खेळाडूंना संघात सामावून घेण्यासाठी आग्रही असलेली दिसते, मात्र एका खेळाडूसाठी तीनं लावलेल्या बोलीनं भल्याभल्यांनी तोंडात बोटं घातली आहेत.

शाहरुख खान असं या खेळाडूचं नाव आहे. तो एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही, मात्र तामीळनाडूकडून खेळताना त्याने देशांतर्गंत स्पर्धेत तुफान कामगिरी केलेली आहे. याच खेळीच्या जोरावर त्याची आयपीएलच्या ऑक्शनसाठी निवड करण्यात आली होती. त्याची बेस प्राईज फक्त 20 लाख रुपये होती, मात्र पंजाबनं त्याला खरेदी करण्यासाठी मोजलेली रक्कम ऐकूण तुम्हालाही धक्का बसेल.

किंग्ज इलेव्हन पंजाबनं शाहरुख खानला खरेदी करण्यासाठी 5 कोटी 25 लाख रुपये मोजले आहेत. त्याला खरेदी करण्यासाठी दिल्ली तसेच आरसीबीने उत्सुकता दाखवली होती, त्यातच प्रीति ईरेला पेटल्याने त्याची बोली वाढतच गेली, अखेर दिल्ली आणि आरसीबीनं त्याला घेण्याचा नाद सोडल्यानंतर तो पंजाबच्या ताफ्यात सहभागी झाला.

शाहरुख खान आपल्या धडाकेबाज खेळीसाठी प्रसिद्ध आहे. तामीळनाडू प्रीमिअर लीगमध्ये त्याने केलेल्या स्फोटक खेळी त्याची बलस्थानं होती, यामुळे त्याला एवढी मोठी किंमत मिळाली. मॅच फिनिशर म्हणून त्याचा लौकिक आहे, पंजाबला त्याचा कितपत उपयोग होईल हे येत्या आयपीएलमध्येच पहायला मिळेल.

मॅक्सवेलला मिळाली तुफान किंमत-

ग्लेन मॅक्सवेलला विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील आरसीबीने विकत घेतलं आहे. त्याला १४ कोटी २५ लाख रुपयांची बोली लावण्यात आली आहे. मॅक्सवेलची बोली २ कोटी रुपयांपासून सुरु झाली होती. राजस्थान व कोलकाता या दोन संघांनी बोलीची सुरुवात केल्यानंतर आरसीबी आणि सीएसकेने मॅक्सवेलची बोली पुढे नेली. शेवटी चेन्नईने माघार घेतल्याने आरसीबीने या बोलीत बाजी मारली.

ख्रिस मॉरीसनं बोलीचं रेकॉर्ड तोडलं-

चेन्नई येथे सुरु असलेल्या आयपीएलच्या लिलावाकडे साऱ्या क्रीडाप्रेमींचं लक्ष लागलं आहे. ग्लेन मॅक्सवेलसारख्या आयपीएलमध्ये फारसा करिश्मा न दाखवणाऱ्या खेळाडूवर 14.25 लाख रुपयांची बोली लावल्यानं सारे हैराण झाले होते, त्यानंतर आणखी एका धक्कादायक बोलीची नोंद झाली आहे. ख्रिस मॉरिसवर ही बोली लावण्यात आली आहे.

दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू ख्रिस मॉरिसला राजस्थान रॉयल्सनं आपल्या ताफ्यात सहभागी करुन घेतलं आहे. त्याला लावलेली बोलीची रक्कम ऐकली तर तुम्ही थक्क व्हाल, त्याला तब्बल 16 कोटी 25 लाख रुपयांची बोली लावण्यात आली आहे. आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासातील ही सर्वात मोठी बोली ठरली आहे.

आयपीएलच्या इतिहासात भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग सर्वात महागडा खेळाडू मानला जात होता. 2015 मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सने त्याला 16 कोटी रुपयांची बोली लावली होती. मात्र ख्रिस मॉरिसने त्याचाही रेकॉर्ड तोडला आहे.

मोईन अली चेन्नईची पसंती-

3 वेळचा आयपीएल फायनल विजेता संघ चेन्नई सुपर किंगने इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू ‘मोईन अली’ याच्यावर  7 कोटीची बोली लावली. पंजाब किंग्स आणि चेन्नई सुपर किंग यांच्यात लिलावा रम्यान रंगलेल्या लढाईत चेन्नईने बाजी मारत मोईन अलीला आपल्या संघात स्थान दिले आहे. रविंद्र जडेजा आणि सॅम करन सोबत मोईन अलीच्या रुपात तिसरा अष्टपैलू खेळाडू चेन्नईला मिळाला आहे.

थोडक्यात बातम्या-

घरात सुरक्षित ठिकाणी ठेवलेल्या पैशांसोबत असं काही घडलं, सारेच झालेत हैराण!

“राज्यातील काँग्रेसचे नेते बॉलिवूडच्या अभिनेत्यांना धमक्या देत आहेत”

बोली वाढत होती मात्र चेन्नई हटली नाही, त्या खेळाडूला अखेर घेतलंच!

“आता का ट्विट करत नाहीत?, यांच्या सिनेमांचं शुटिंग होऊ देणार नाही”

“हे शिवभक्तांचं सरकार, लोकांच्या सुरक्षिततेसाठी निर्बंध घातलेेले आहेत”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More