बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दुर्दैवी! ‘ही’ गर्भवती डॉक्टर शेवटच्या श्वासापर्यंत लोकांना करत होती सतर्क, पाहा व्हिडिओ

नवी दिल्ली | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत असताना पाहायला मिळत आहेत. त्यातच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. डिंपल अरोरा नावाच्या गर्भवती डॉक्टरने आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत लोकांना कोरोनापासून वाचण्यासाठी काळजी घेण्याचं आवाहन केलं.

11 एप्रिल रोजी डिंपल अरोरा यांना कोरोनाची लागण झाली होती. दरम्यान, त्यांची तब्येत खूप जास्त खराब झाल्याने आणि त्या गर्भवती असल्याने त्यांना जास्त त्रास होऊ लागला. पण या त्रासात देखील त्यांनी एक व्हिडिओ जारी करून लोकांना कोरोनाला गंभीरपणे घेण्याचं आवाहन केलं होतं.

त्यांचा हा व्हिडीओ त्यांचे पती रवी चावला यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे. 11 एप्रिल ते 26 एप्रिल दरम्यान गर्भवती असलेल्या डिंपल अरोरा या कोरोनाशी झुंज देत होत्या. परंतु, 26 एप्रिल रोजी त्यांची कोरोनाशी असलेली झुंज अपयशी ठरली आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या उपचारादरम्यान त्यांनी एक व्हिडीओ काढून लोकांना सतर्क केलं होतं. तसेच मास्क घाला आणि कोरोनाला गंभीरपणे घ्या, असं देखील भावनिक आवाहन केलं होतं.

रवी चावला यांनी दोन दिवसापूर्वी पोस्ट केलेल्या या व्हिडिओवर देशभरातून मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत असल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच अनेकांनी हा व्हिडीओ रिट्विट करत डिंपल अरोरा यांनी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत लोकांना सतर्क केल्यामुळे त्यांच्याबद्दल अभिमानही व्यक्त केला. या दरम्यान, डिंपल अरोरा यांच्यासह 7 महिन्यांच्या त्यांच्या पोटात असलेल्या बाळाचाही दुर्दैवी अंत झाला.

पाहा व्हिडीओ

थोडक्यात बातम्या –

दोन दिवसांपूर्वी रूग्णालयातुन बेपत्ता झालेल्या कोरोनाबाधित महिलेचा ‘या’ शहरात सापडला मृतदेह

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्याचा महाराष्ट्रातील ‘या’ देवस्थानचा मोठा निर्णय

मोठी बातमी ! मराठा आरक्षणाबाबत केंद्र सरकारची पुनर्विचार याचिका

लाॅकडाऊनचा सकारात्मक परिणाम?; मुंबईत कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस घट

महाविकास आघाडीत बिघाडी?; राष्ट्रवादी विरुद्ध मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अशी खडाजंगी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More