Top News देश

माणुसकी मेली, गर्भवती हत्तीणीच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर फुटले अश्रूंचे बांध…!

मुंबई | केरळमध्ये गर्भवती हत्तीणीला अमानवी पद्धचीने मारल्याची घटना समोर आली. हत्तीणीच्या अशाप्रकारे केलेल्या निर्घुण हत्येनंतर सर्वच स्तरातून मोठा संताप व्यक्त होत आहे. सोशल मीडियावर आरोपींच्या विरूद्ध अतिशय संतापाची लाट उसळली आहे. तर हत्तीणीच्या अशा जाण्याने लोकांचा सोशल मीडियावर अश्रूंचा बांध फुटला आहे.

केरळमध्ये एक गर्भवती हत्तीण जंगलातून खाण्याच्या शोधात एका गावातील रस्त्यावर आली. त्यावेळी तिला काही लोकांनी अननसातून फटाके खायला दिले. अननसाचं केवळ आवरण होतं आणि त्या आत फटाके ठेवण्यात आले होते. हत्तीणीने ते अननस आहे असं समजून, फटाक्यांनी भरलेलं अननस खाल्लं आणि काही वेळातच तिच्या तोंडात स्फोट झाला आणि त्यातच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.

माणुस कधीपर्यंत अशी क्रूर कृत्य करत राहणार… अशाच वेळोवेळी केलेल्या क्रुर कृत्याची शिक्षा माणुस कोरोनाच्या रूपाने आणि निसर्ग वादळाच्या तडाख्याच्या रूपाने भोगत आहे, अशा आशयाच्या संतप्त प्रतिक्रिया लोक सोशल मीडियावर लिहीत आहे.

दुसरीकडे ज्या पद्धतीने ज्या कुणी माणसाने अशा प्रकारे हत्तीणाला मारलं आहे त्यालाही तश्याच पद्धतीने मारण्यात यावं. त्याचाही मृत्यू तश्याच प्रकारे व्हायला पाहिजे, अशीही संतप्त भावना लोक व्यक्त करू लागले आहेत.

ट्रेंडिंग बातम्या-

देशातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत उद्धव ठाकरेंचा समावेश

कोरोना संपल्यानंतर मी राज्यभर दौरा करणार- पंकजा मुंडे

महत्वाच्या बातम्या-

कोरोनाचा मृत्यूदर कमी करण्यासाठी शासनाने उचललं महत्त्वाचं पाऊल!

आनंदाची बातमी… कोरोनाला आपण हरवणारच, राजेश टोपेंची महाराष्ट्राला मोठी गूडन्यूज!

निसर्ग चक्रीवादळाचं संकट टळलं, महाराष्ट्रावर विठू-माऊली आणि मुंबादेवीची कृपा- उद्धव ठाकरे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या