गरोदरपणात महिलांचा आहार कसा असावा, जाणून घ्या ICMR ची मार्गदर्शक तत्त्वे

Pregnancy Tips l गरोदरपणात महिलांना स्वतःची विशेष काळजी घ्यावी लागते. गरोदरपणात महिलांचा आहार काय असतो, त्या किती विश्रांती घेतात या सर्व गोष्टींचा परिणाम त्यांच्या गर्भावर होतो. नवजात बालकाच्या जन्मानंतर त्याचा विकास आणि आरोग्य पोषक तत्वांवर अवलंबून असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत महिलांनी स्वत:बरोबरच मुलांचीही काळजी घेणे गरजेचे आहे.

आहारात या पदार्थांचा समावेश करा :

अलीकडे, ICMR ने आहारविषयक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यामध्ये गर्भवती महिलांसाठी योग्य माहिती दिली आहे. या अहवालानुसार, भारतातील बहुतांश आजार हे खराब आहारामुळे होतात तर आज आपण गरोदरपणात महिलांचा आहार काय असावा हे जाणून घेऊयात…

ICMR आहाराच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, महिलांनी सकाळी 6 वाजता एक ग्लास (150 मिली) दूध प्यावे. यानंतर सकाळी 8 वाजता आहारात 75 ग्रॅम हिरव्या भाज्या, 20 ग्रॅम कडधान्ये, 20 ग्रॅम काजू आणि 5 ग्रॅम तेल यांचा समावेश करावा.

गर्भवती महिलांनी जेवणात 100 ग्रॅम तांदूळ किंवा रोटी, 30 ग्रॅम डाळी किंवा मांस, भाज्यांची करी, 75 ग्रॅम हिरव्या भाज्या, 200 ग्रॅम फळे आणि 100 ग्रॅम ताजी फळे खावीत. त्याचवेळी, दुपारी 4 वाजता स्नॅक म्हणून 20 ग्रॅम काजू व दुधाचा समावेश करावा. रात्री महिलांनी 60 ग्रॅम भात किंवा रोटी, 25 ग्रॅम हरभरा, 75 ग्रॅम हिरव्या भाज्या आणि 50 ग्रॅम ताजी फळे खावीत.

Pregnancy Tips l काय करावे आणि काय करू नये? :

गरोदरपणात महिलांनी आपल्या आहारात आवळा, पेरू आणि संत्री या व्हिटॅमिन सी समृद्ध फळांचा समावेश करावा. मळमळ किंवा उलट्या झाल्यास, दिवसभरात थोडेसे जेवण घ्या. व्हिटॅमिन डी राखण्यासाठी दररोज किमान 15 मिनिटे उन्हात बसा. तुमच्या फॉलिक ॲसिडचे प्रमाण पूर्ण करण्यासाठी हिरव्या भाज्या खा.

तसेच गरोदरपणात धूम्रपान, मद्यपान आणि तंबाखूपासून दूर राहा. कार्बोनेटेड पाण्यापासून दूर रहा. जेवल्यानंतर लगेच झोपू नका किंवा बसू नका. थोडा वेळ चालत जा. याशिवाय जेवणानंतर चहा किंवा कॉफी पिऊ नका.

News Title – pregnant mothers ICMR revised diet guideline

महत्त्वाच्या बातम्या

घराचं स्वप्न महागलं; ‘या’ प्रमुख शहरांमध्ये घराच्या किंमतीत वाढ

‘तारक मेहता…’ मधील सोढी अखेर घरी परतला; एवढ्या दिवस कुठे होता?, धक्कादायक खुलासा समोर

विराट कोहलीच्या चाहत्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर; ‘तो’ व्हिडिओ तूफान व्हायरल

जबरदस्त आणि आकर्षक टीव्हीएस कंपनीची ब्लॅक एडिशन लाँच, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

“मला काहीही फरक पडत नाही”, पांड्याचं वक्तव्य चर्चेत