बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

गर्भवती महिलांना कोरोना संसर्ग होण्याचा अधिक धोका- ICMR

मुंबई | कोरोनाचं संकट आता कुठे आटोक्यात येत होतं मात्र पुन्हा एकदा रुग्णसंख्येत वाढ होत चालली आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत कोरोनाची लागण झालेल्या गर्भवती महिलांमुळे त्यांच्या बाळांना कोरोना होण्याचा धोका कमी असल्याचा दावा वैज्ञानिकांनी केला होता. अशातच आता कोरोनामुळे गर्भवती स्त्रियांना जास्त धोका असल्याचं अभ्यासातून समजतय.

कोरोना गर्भवती महिलांना जास्त प्रमाणात संक्रमित करू शकतो, असं इंडियन काऊंन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हणजेच आयसीएमआरने केलेल्या अभ्यासातून समोर आलं आहे. गर्भवती आणि बाळंतपण करणाऱ्या स्त्रियांमध्ये मृत्यूचा धोका वाढतो, असंही अभ्यासातून समोर आलं आहे.

कोरोना व्हायरसचा संसर्ग असताना बाळाचा जन्म झाल्यास आईमुळे बाळालाही कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. याआधीच्या लाटेत आई कोरोना पॉझिटीव्ह असूनही बाळाला कोरोना संसर्ग होण्याची शक्यता कमी होती मात्र येणाऱ्या तिसऱ्या लाटेत ही शक्यता वाढू शकते.

दरम्यान, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत अनेक शक्यता वर्तवल्या गेल्या आहेत. अनेक नवनवीन माहिती संशोधनातून समोर येत आहे. त्यामुळे तिसरी लाट येण्यापूर्वीच वातावरण चिंतेचं झालं आहे.

थोडक्यात बातम्या – 

‘पुढचे 3 महिने अत्यंत महत्वाचे’; केंद्र सरकारने नागरिकांना केलं हे महत्त्वाचं आवाहन

“मराठवाडा वाॅटर ग्रीडची अवस्था राजाच्या मेलेल्या पोपटासारखी”

“आपण सर्व भारतीय पंतप्रधान मोदींना हे गिफ्ट देऊयात”

‘हा पोरखेळ एकदिवस अंगावर उलटेल’; संजय राऊतांचा इशारा

“इम्तियाज जलील यांना निवडून आणण्याच्या पापात आम्ही सुद्धा भागीदार”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More